Join us

सामूहिक बलात्काराने पुन्हा हादरली मुंबई; १५ वर्षीय मुलीचा ६ मित्रांनी केला घात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 7:54 AM

लोअर परळ येथे एका १५ वर्षीय मुलीवर ६ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लोअर परळ येथे एका १५ वर्षीय मुलीवर ६ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. पीडित तिच्या एका मित्रासोबत अन्य मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली असता, शुक्रवारी रात्री चाळीत हा प्रकार घडला. याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी सर्वांवर गुन्हा नोंदवत तीन अल्पवयीन आरोपींची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. 

सहा आरोपींपैकी एकजण पीडितेचा मित्र आहे. हे दोघेही दुसऱ्या मित्राचा वाढदिवससाठी चाळीत गेले होते. त्यावेळी त्याठिकाणी अन्य पाच आरोपींदेखील उपस्थित होते. रात्री  उशिरा चाळीतील रहिवाशांनी मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि स्थानिक पोलिस ठाण्याला कळविले. त्यानुसार पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.  

पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल 

- मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे, भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (संबंधित कलमांनुसार गुन्हा) आरोपींविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. - यात तीन आरोपी  अल्पवयीन असून, त्यांना ताब्यात घेत डोंगरी येथील बालसुधारगृहात पाठविण्यात आले, तर प्रौढ असलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना ३० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.- या घटनेतून मुलींवर होणारे अत्याचार त्यांच्या जवळच्याच किंवा नात्यातील व्यक्तींकडून होतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :मुंबई