Join us

धक्कादायक ! मुंबईत तासाला १४८ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या आठवडाभरात तासाला सरासरी १४८ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या आठवडाभरात तासाला सरासरी १४८ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणही आता ११ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचले आहे. मंगळवारपासून मुंबईसह राज्यभरात रात्रीची संचारबंदी लागू झाली आहे.

मुंबई महानगरपालिकेने चाचण्यांचे प्रमाण दुप्पट करण्याचा निर्णय घेत सरासरी २० ते २५ हजारपर्यंत होणाऱ्या चाचण्यांची संख्या ४७ हजारांच्या पुढे नेली आहे. आतापर्यंत चाचण्या केलेले रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण दहा टक्‍क्‍यांच्या आत होते. २० मार्च रोजी उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या २१ हजार ३३५ होती. त्यात, ४७० रुग्ण अत्यवस्थ होते. २५ मार्च रोजी ही संख्या ५२७ वर पोहाेचली. मुंबईत उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ३३ हजार ९६१ एवढी झाली आहे.

आठवडाभरातील रुग्णांचा आढावा

२० मार्च - २७४६

२१ मार्च - ३४९७

२२ मार्च - ३०२७

२३ मार्च - ३२४५

२४ मार्च - ४९०७

२५ मार्च - ५१८७

२६ मार्च - ५५१३