धक्कादायक! नाल्यात पडून १८ वर्षीय मुलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 14:43 IST2020-02-19T14:38:05+5:302020-02-19T14:43:03+5:30
तातडीने नाल्यातून बाहेर काढले आणि जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

धक्कादायक! नाल्यात पडून १८ वर्षीय मुलीचा मृत्यू
ठळक मुद्देकोमल जयराम मंडल (१८) असं या मृत मुलीचं नाव आहे. शोधकार्यानंतर सात तासानंतर मध्यरात्री ३.२० वाजताच्या सुमारास मुलीचा पत्ता लागला.
मुंबई - पश्चिम उपनगरातील अंधेरी येथील ओशिवरा परिसरातील आदर्श नगर येथे मंगळवारी नाल्यात पडलेल्या १८ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. कोमल जयराम मंडल (१८) असं या मृत मुलीचं नाव आहे.
मंगळवारी रात्री आठच्या वाजताच्या सुमारास ओशिवारातील मेगा मॉलजवळील आदर्श नगरच्या एका ओढ्यात कोमल पडली. त्यानंतर अग्निशमन दलाचे अधिकारी आणि पोलीस पथकाने त्या मुलीला शोधण्याचे काम सुरु केले. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शोधकार्यानंतर सात तासानंतर मध्यरात्री ३.२० वाजताच्या सुमारास मुलीचा पत्ता लागला. तिला तातडीने नाल्यातून बाहेर काढले आणि जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू आहे.