Join us

धक्कादायक! सिलिंगचे प्लास्टर पडून ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 15:19 IST

Accidental Death : गोरेगाव पश्चिमच्या एमएमआरडीए पी ८ इमारतीत हा अपघात घडला असून याबाबत स्थानकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.

ठळक मुद्देअर्सलन अन्सारी (८) या मुलाचा जागीच मृत्यू झाला.

मुंबई - राहत्या घराच्या सिलिंगचे प्लास्टर डोक्यात पडून अर्सलन अन्सारी (८) या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची आई फहमीदा या देखील गंभीर जखमी झाल्या असून त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. 

गोरेगाव पश्चिमच्या एमएमआरडीए पी ८ इमारतीत हा अपघात घडला असून याबाबत स्थानकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. गोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. अर्सलनचे शवविच्छेदन झाले असून काही वेळात त्याचे दफनविधी करण्यात येणार असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :मृत्यूमुंबईपोलिस