धक्कादायक! वरळीच्या समुद्रात बोट बुडाली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 07:29 PM2019-03-18T19:29:15+5:302019-03-18T19:30:24+5:30
एक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई - वरळीजवळील समुद्रात बोट बुडाली असून त्यातील सहा जणांचा सुदैवाने जीव वाचवण्यात आला आहे. तर एक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. सोमवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून याबाबत माहिती मिळाल्यानंतर तटरक्षक दलाने तात्काळ बचावकार्य सुरु केले आणि सहा जणांचे प्राण वाचविले. तर एकाचा हेलिकॉप्टर आणि बोटीच्या मदतीने शोध घेण्यात येत आहे.
वरळीच्या समुद्रात बोट बुडाल्याची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाने अमर्त्या बोटीच्या मदतीने बुडालेल्या बोटीतील प्रवाशांना वाचवण्याची मोहीम हाती घेतली. शर्थीच्या प्रयत्नानंतर बोटीतील सहा जणांना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश आले आहे. तसंच, सर्व जण सुरक्षित असून, त्यांना प्रथमोपचार देण्यात आले. मात्र या दुर्घटनेत एक प्रवासी बेपत्ता झाला आहे.
Indian Coast Guard ship Amaratya rescued 6 of 7 crew of the sinking Tug Revti off Mumbai at 1100 hours today. All rescued crew are safe and first aid has been provided to them. 2 coast guard ships and a coast guard helicopter continue search for the one missing crew. pic.twitter.com/IV9Th5Z9QM
— ANI (@ANI) March 18, 2019