मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी रस्त्यावर पोलीस उतरले आहेत.वरळी, नायगाव आणि भायखळा येथे पोलीस वसाहती आहेत. येथे देखील पालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जंतूनाशक फवारणी आदी गोष्टींची अंमलबजावणी केली आहे.
आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने पोलीस अधिकारी रहात असलेली इमारत सील केली आहे. विशेष म्हणजे याच वसाहतीच्यानजीकच आर.ए.किडवाई मार्ग पोलिस ठाणे आहे. आर.ए.किवडाई मार्ग पोलिस वसाहतीत राहणारा हा सहाय्यक पोलिस निरीक्षक एसबी वनमध्ये कार्यरत होता. त्याला दोन दिवसांपासून सर्दी व ताप येत होता त्यामुळे त्यांनी दोन दिवसांपूर्वी के.ई.एम रुग्णालयात जाऊन कोरोना चाचणी केली असता चाचणी पॉझिटिव्ह आली. त्या अधिकाऱ्याला उपचारासाठी अंधेरीच्या सेव्हन हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.