धक्कादायक! चार तोळ्यांच्या दागिन्यांत निघाले अवघे ५ ग्रॅम सोने

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 05:42 AM2019-07-30T05:42:57+5:302019-07-30T05:43:00+5:30

बनावट दागिन्यांवरील कर्ज प्रकरण; सोन्याऐवजी दागिन्यांत शिशाचा वापर

Shocking! Four grams of jewelery went to the tune of 1 gram of gold | धक्कादायक! चार तोळ्यांच्या दागिन्यांत निघाले अवघे ५ ग्रॅम सोने

धक्कादायक! चार तोळ्यांच्या दागिन्यांत निघाले अवघे ५ ग्रॅम सोने

Next

मुंबई : बनावट दागिन्यांवर कर्ज घेणाऱ्या टोळीने एकाच प्रकारचे दागिने तयार करत, त्यात शिशाचा वापर केल्याची माहिती तपासात समोर आली. यासाठी त्यांनी हिऱ्यांच्या बांगड्या आणि कानातल्यांचा वापर केला. यात लिलावात दागिने घेणाºयांना सर्वाधिक फटका बसला आहे.

या प्रकरणात दिनेश सोनी, रमेश सोनी आणि विमल सोनी या कारगीर भावंडांनी आतापर्यंत दोन कोटींचा गंडा घातल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. त्यांच्यासह या प्रकरणात अनिलकुमार गुलाबचंद्र स्वामी, प्रशांत संदरेशन नारायण, नितू सतीशन विलयील यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी भार्इंदर येथील घरातच बनावट दागिन्यांचा कारखाना सुरूकेला होता. मालमत्ता कक्षाच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगड्यांवर खडे बसविण्यासाठी राखून ठेवलेल्या जागेत एक ग्रॅम सोने भरणे सराफ बाजारातील नियमानुसार बंधनकारक असते. मात्र, ही मंडळी त्यात, सोन्याऐवजी शिसे भरत.

गहाण ठेवण्यासाठी बनविलेल्या प्रत्येक बांगडीत तब्बल ३० खडे होते. त्यामुळे या बांगडीतल्या एकूण खड्यांखाली तीस ग्रॅम सोन्याऐवजी शिसे भरलेले होते, तसेच कर्ज देण्यापूर्वी बँका, संस्था गहाण पडणारे दागिने वरवर २५ मायक्रॉनपर्यंत तपासतात. खडे काढून पोकळीत सोनेच आहे का, हे तपासत नाहीत, हे दिनेशला माहिती होते. याचाच वापर करत त्याने एकसारखे दागिने तयार केले आणि त्यावर कर्ज घेतल्याची माहिती तपासात समोर आली. नुकतेच या टोळीने एका खासगी वित्त संस्थेकडून बनावट दागिन्यांवर ९५ लाख रुपयांचे कर्ज घेतल्याची माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे. यासाठी त्यांनी २ कोटींचे दागिने गहाण ठेवल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार, अधिक तपास सुरू आहे.

लिलावाच्या रकमेवरही नजर...
बँकांत दागिने गहाण ठेवायचे. नंतर, त्याचे हप्ते चुकविल्यानंतर संबंधित बँक ते दागिने लिलावात काढत होती. लिलावातही दिलेले कर्ज आणि व्याजाची रक्कम वजा करत, उर्वरित रक्कम बँकेकडून या टोळीला मिळत होते. त्यामुळे दोन्ही बाजूने त्यांना पैशांचा फायदा होत असल्याचेही तपासात समोर आले.

सराफाकडून फसवणुकीची तक्रार
पोलीस तपासात समोर आलेल्या एका प्रकरणात सराफाने लिलावात चार तोळे सोन्याचे दागिने विकत घेतले. ते सोने वितळवले, तेव्हा त्यात केवळ ५ ग्रॅम सोने तर उर्वरित शिसे मिळाले. त्यांनी या प्रकरणी गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली.

ही कारणे देत ठेवायचे दागिने गहाण
उपचारासाठी, शस्त्रक्रियेसाठी, तसेच लग्नकार्य, गृहखरेदीसाठी कर्ज अशी विविध कारणे देत ही मंडळी दागिने गहाण ठेवत होती.

Web Title: Shocking! Four grams of jewelery went to the tune of 1 gram of gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.