शॉकींग संशोधन! मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाने मांडली 'मराठा समाजाची व्यथा'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 07:15 PM2018-11-29T19:15:56+5:302018-11-29T19:20:01+5:30
राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातून समोर आलेली आकडेवारी पाहून निश्चितच धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
मुंबई - राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातून समोर आलेली आकडेवारी पाहून निश्चितच धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कारण, मराठा समाजाचं धक्कादायक वास्तव राज्य मागास अहवालाच्या आकडेवारीतून समोर आलं आहे. राज्यात आजही 76.86 टक्के मराठा समाज शेतीवर अवलंबून आहे. शेती हेच या मराठा समाजाच्या उपजीविकेचं प्रमुख साधन आहे. तर सरकारी, निमसरकारी सेवेत मराठा समाजाचा हिस्सा केवळ 6 टक्के आहे. विशेष म्हणजे त्यातही सर्वाधिक नोकऱ्या या 'ड' वर्गातच आहेत. त्यामुळे राजकारणात पुढारलेल्या मराठा समाजातील ठराविक नेतेमंडळी आणि पुढाऱ्यांची प्रगती झाली आहे. तर इतर मराठा समाज आजही अतिशय सामान्य जीवन जगत असल्याचेच दिसून येते.
* मागासवर्गीय आयोगाच्या अहवालात आलेली आकडेवारी
93 टक्के मराठा समाजाचे उत्पन्न 1 लाखांच्यापेक्षा कमी
71 टक्के मराठा शेतकरी अल्पभूधारक
70 टक्के मराठा कुटुंबीयांची घरे कच्ची
43.69 टक्के 10 वी 12 वी शिक्षण घेतलेले
31.79 टक्के कुटुंबाकडे अद्यापही गॅस नाही
35.39 टक्के कुटुंबाकडे नळ जोडणी नाही
मराठा समाजातील व्यक्तींपैकी 13.42 टक्के निरक्षर
35.31 टक्के प्राथमिक शिक्षण घेतलेले
6.71 टक्केच पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण घेतलेल्याचे प्रमाण 0.71 टक्के
मराठा समाजाची बीपीएल टक्केवारी 24.2 टक्के