धक्कादायक ! 999 रुपयांमध्ये मिळत होती सेक्स क्लबची मेंबरशिप
By admin | Published: April 6, 2017 07:22 AM2017-04-06T07:22:40+5:302017-04-06T07:45:06+5:30
ब-याचदा ग्राहकांना स्वतःकडे आकर्षिक करण्यासाठी अनेक कंपन्या उत्पादनावर मेंबरशिप स्कीम देत असतात
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - ब-याचदा ग्राहकांना स्वतःकडे आकर्षिक करण्यासाठी अनेक कंपन्या उत्पादनांवर मेंबरशिप स्कीम देत असतात. मात्र मुंबईत मुली आणि मॉडेल्ससोबत फिरण्याबरोबरच सेक्स करण्याचं आमिष दाखवून सेक्स क्लबची मेंबरशिप दिली जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील सायबर पोलिसांनी हे सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी मोहम्मद शकीब कोर्टवाला, गिरीश जयस्वाल, कमल विश्वकर्मा, अर्जुन कनौजिया, शरीफ खान या पाच जणांना अटक केली आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या दोन महिन्यांत या आरोपींनी सेक्स क्लबसाठी जवळपास 2 हजार लोकांचे मेंबरशिपच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन केलं असून, जवळपास 20 लाख रुपये कमावल्याचं समजतं आहे. या आरोपींकडून 300हून अधिक सिम कार्ड, 37 मोबाईल फोन, 3 लॅपटॉप आणि 16 हार्ड डिस्क असं सामान जप्त करण्यात आलं आहे. आरोपींनी तीन वेगवेगळ्या वेबसाइट बनवल्या होत्या. त्या वेबसाइटच्या माध्यमातून ते लोकांची फसवणूक करत होते. या वेबसाइट ओपन केल्यानंतर वेगवेगळ्या मुलींचे फोटो दिसायचे. तसेच वेबसाइटवर आलेल्या तरुणांना 999 रुपयांत रजिस्ट्रेशन करण्यास सांगितलं जात होते. ही रक्कम ऑनलाइन किंवा पेटीएमद्वारे जमा करण्याचं आवाहनही केलं जातं होतं.
रजिस्ट्रेशन करणा-याला स्वतःचा नंबरही द्यावा लागत होता. मात्र नंबर देणा-या काही जणांना फोन आलेच नाही, तर काहींना मुली आणि मॉडेलच्या ऐवजी वेबसाइटशी संबंधित लोकांचे फोन आले होते. तसेच या वेबसाइटवरून लोकांना मुली आणि मॉडेल्स यांचे फोटोही दाखवण्यात येते होते. मेंबरशिप घेतल्यानंतर या मुलींसोबत फिरणे आणि सेक्स करण्यासाठी वेगवेगळे दर सांगायचे. पेटीएमच्या माध्यमातून पेमेंट केलेले नंबरही वारंवार बदलण्यात येत असून, नवेच नंबर लोकांना दिले जात होते. आरोपी काही प्लेसमेंट एजन्सीच्याही संपर्कात होते. पेमेंट खात्यात जमा झाल्यावर आरोपी पेटीएम अकाऊंट असलेला नंबर बंद करत असल्याचंही समोर आलं आहे. रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या लोकांचा सेक्सची वेबसाइट असल्यानं पोलिसांत तक्रार देण्यास धीर होत नव्हता. मात्र अखेर सायबर पोलिसांनी हे रॅकेट उद्ध्वस्त केलं असून, आरोपींचा पर्दाफाश केला आहे. अवघ्या दोन महिन्यांत या आरोपींनी लाखो रुपये कमावले आहेत.