धक्कादायक! शालिमार एक्स्प्रेसमध्ये जिलेटिनच्या कांड्या, एलटीटीचा परिसर केला रिकामा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 12:32 PM2019-06-05T12:32:17+5:302019-06-05T13:16:49+5:30
शालिमार एक्स्प्रेसमध्ये जिलेटिनच्या 5 कांड्या सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
मुंबईः मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनलवर उभ्या असलेल्या शालिमार एक्सप्रेसमध्ये जिलेटीनच्या 5 कांड्या आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. जिलेटीनच्या कांड्या या बुधवारी दुपारच्या सुमारास शालिमार एक्सप्रेसची साफसफाई करताना सापडल्या आहेत.
लोकमान्य टिळक टर्मिनल येथे जीआरपीएफ, आरपीएफचे जवान आणि बॉम्बशोधक पथक दाखल झाले आहेत.
पोलिसांनी एलटीटी परिसर रिकामा केला असून या एक्सप्रेसची तपासणी करत आहेत. मात्र, या जिलेटीनच्या कांड्या या एक्सप्रेस आल्या कटून याबाबत अद्याप माहिती मिळालेली नसून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मुंबई नेहमीच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असते. त्यामुळं कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पोलिसांनी महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेत आणखी वाढ केली आहे. त्याशिवाय, एलटीटी परिसरातील प्रवाशांना पोलीसांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.
नववर्षांच्या सुरुवातीपासून देशातील सीमेवर आणि अंतर्गत काही भागात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने संपूर्ण देशावर भीतीचे सावट निर्माण झाले. दहशतवाद्यांचे मुख्य लक्ष्य मुंबईतील गर्दीच्या स्थानक आहे. त्यामुळे गर्दीच्या स्थानक असलेले लोकमान्य टिळक टर्मिनसवर बॉम्बसदृश वस्तू आढळून आले आहेत. सुरक्षा कर्मचारी आणि अधिकारी याचा पहारा वाढविला आहे. इसिसचे 15 दहशतवादी सागरी मार्गाने लक्षद्वीपकडे रवाना झाल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे केरळसह संपूर्ण किनारपट्टीवरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. यासह मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकावर सुरक्षा व्यवस्थेला बळकटी देण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षा बल, पोलीस, होमगार्ड, महाराष्ट्र सुरक्षा बल या सुरक्षा बलाकडून प्रत्येक स्थानकावर पहारा चोख ठेवण्यात आला असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिका-यांनी दिली. देशात पुलवामा येथे सीआरएएफ जवानांवर झालेला हल्ला, कानपूर-भिवानी कालिंदी एक्स्प्रेस शौचालय कमी तीव्रतेचा स्फोट, कर्जत-आपटा एसटीत आयईडी बॉम्ब आढळून आला, या घटनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात ‘अलर्ट’चे आदेश दिले होते. सुरक्षा व्यवस्थेकडून श्वान पथक, बॉम्ब शोधक आणि निकामी पथक, ऑपरेशन बॉक्स, कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. यासह सुरक्षा व्यवस्थेला आणखी कडक करण्यात आले आहे, असे रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी सांगितले.
------------
घटनास्थळी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. बॉम्बसदृश वस्तू दिसून आले आहे. जिलेटीन कांड्या, बॅटरी, रॉकेट, विद्युत तारा अशा वस्तू मिळाल्या आहेत. अजून तपास सुरू आहे. प्रवाशांनी अफवांवर विश्वास ठेवू नका.
- अश्रफ के . के. , विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे