धक्कादायक! छेडछाडीला कंटाळून विद्यार्थीनीचा वर्गातच आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 09:38 AM2023-07-21T09:38:50+5:302023-07-21T09:39:09+5:30

मालाडमधील प्रकार, आरोपीला अटक

Shocking! Tired of being teased, a student attempted suicide in the classroom | धक्कादायक! छेडछाडीला कंटाळून विद्यार्थीनीचा वर्गातच आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक! छेडछाडीला कंटाळून विद्यार्थीनीचा वर्गातच आत्महत्येचा प्रयत्न

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : छेडछाडीला कंटाळून वर्गातच विद्यार्थिनीने कटरने हातावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक  घटना समोर आली. तिच्या चौकशीत आरोपीने तिच्यासह तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची माहिती समोर येताच कुरार पोलिसांनी ३२ वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या. तीनही मुली ११ ते १२ वयोगटातील आहेत.

पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून, पोलिसांनी गुन्हा नोंदवत अटकेची कारवाई केली. तक्रारदार आणि आरोपी एकाच परिसरात राहण्यास आहेत. आरोपी खासगी नोकरी करतो. तिन्ही मुली माध्यमिक शाळेत शिकतात. शाळा तसेच शिकवणीला ये-जा करताना आरोपी त्यांचा पाठलाग करायचा. त्यांना खाऊ, पैसे देण्याच्या बहाण्याने केसांना व अंगाला हात लावत होता. जूनपासून छेडछाड सुरू होती. या प्रकाराने मुली घाबरल्या. अखेर तिघींपैकी एकीने वर्गातच कंपासपेटीमधील कटरने स्वतःच्या हाताला दुखापत करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार शिक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी चौकशी केली. तेव्हा मुलीने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पालकांना बोलावून याबाबत कळवले. अखेर, मुलीच्या आईने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. आईनेच आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. पोलिस कारवाईनंतर मुलींचेही समुपदेशन करण्यात आले.

Web Title: Shocking! Tired of being teased, a student attempted suicide in the classroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.