Shocking! मुलगा आरव माझा तो सीन सारखा पाहत बसायचा, ट्विंकल खन्नाने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 01:28 PM2018-02-06T13:28:25+5:302018-02-06T13:51:07+5:30
नुकत्याच एका टॅबलॉइडला दिलेल्या मुलाखतीत ट्विंकलने मुलगा आरव भाटियामुळे आपली एकदा कशी अवघडल्यासारखी स्थिती झाली होती त्याचा अनुभव सांगितला.
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री ते लेखिका असा प्रवास करणारी ट्विंकल खन्ना सध्या तिच्या प्रोडक्शन हाऊसच्या 'पॅडमॅन' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री राधिका आपटे, सोनम कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग म्हणून ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार प्रसारमाध्यमांना मुलाखती देत असून विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत.
नुकत्याच एका टॅबलॉइडला दिलेल्या मुलाखतीत ट्विंकलने मुलगा आरव भाटियामुळे आपली एकदा कशी अवघडल्यासारखी स्थिती झाली होती त्याचा अनुभव सांगितला. रिपब्लिक वेबसाइटने हे वृत्त दिले आहे. आरवने एकदा असा खोडकरपणा दाखवला कि ज्यामुळे ट्विंकलची चांगलीच पंचाईत झाली.
माझ्या मुलांनी माझे चित्रपट पाहावे असे मला अजिबात वाटत नाही. माझा मुलगा आरव 1996 सालच्या माझ्या जान चित्रपटातील एक क्लिप सारखी सारखी पाहायचा. ट्विंकल सहअभिनेत्याच्या छातीचे चुंबन घेत असल्याचा तो सीन होता. आरव तोच सीन सारखा सारखा पाहत रहायचा. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा आरवने त्या सर्व सीन्सचे एकत्र कोलाज करुन ट्विंकलला तिच्या बर्थ डे ला पाठवले. त्यामुळे ट्विंकलची चांगलीच पंचाईत झाली होती.
ट्विंकलने 1995 साली बॉबी देओलसोबत बरसात सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. लव्ह के लिये कुछ भी करेगा हा ट्विंकलचा बॉलिवूडमधील शेवटचा सिनेमा होता. त्यानंतर तिने लेखन, इंटिरियर डिझायनिंग या आपल्या आवडीच्या क्षेत्रावर सर्व लक्ष केंद्रीत केले.