Join us

धक्कादायक! मुंबईत अल्पवयीन प्रेमीयुगुलाने रेल्वे गाडीसमोर उडी घेऊन संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 14:00 IST

प्रेमीयुगुलाने विक्रोळी रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेस गाडीसमोर उडी घेऊन जीवन संपवलं.

Mumbai Crime: मुंबईतीलविक्रोळीरेल्वे स्थानकावर काल रविवारी धक्कादायक घटना घडली आहे. कुटुंबीयांचा प्रेम प्रकरणाला विरोध असल्याने अल्पवयीन प्रेमीयुगुलाने एक्स्प्रेस गाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. यातील तरुणाचे वय १९ वर्ष तर तरुणीचे वय १५ वर्ष इतके होते.

मिळालेल्या माहितीनुसार, भांडुप येथील हनुमान नगर परिसरातील तरुण-तरुणीचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र यातील तरुण महाराष्ट्रीयन तर तरुणी परप्रांतातील होती. त्यामुळे कुटुंबीयांचा या प्रेम प्रकरणाला विरोध होता.  या विरोधामुळे प्रेमीयुगुलाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. रविवारी सदर तरुणी आपल्या आजीसोबत घराबाहेर पडली होती. परंतु काही वेळानंतर ती आजीपासून बाजूला झाली आणि अचानक गायब झाली. त्यानंतर तिने आपल्या प्रियकराकडे जात त्याच्यासोबत विक्रोळीरेल्वे स्थानकावर एक्स्प्रेस गाडीसमोर उडी घेऊन जीवन संपवलं.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास केला जात आहे. 

टॅग्स :मुंबईरेल्वेदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टविक्रोळी