आॅनलाइन शॉपिंग करा, पण जपून...

By admin | Published: October 23, 2015 03:24 AM2015-10-23T03:24:07+5:302015-10-23T03:24:07+5:30

दिवाळीनिमित्त मुंबईकरांची खरेदीची लगबग सुरू झाली आहे. घरबसल्या वेबसाइटवर स्वस्त आणि आकर्षक आॅफरमुळे मुंबईकर मोठ्या प्रमाणात आॅनलाइन शॉपिंगकडे वळले

Shop online, but save ... | आॅनलाइन शॉपिंग करा, पण जपून...

आॅनलाइन शॉपिंग करा, पण जपून...

Next

मुंबई : दिवाळीनिमित्त मुंबईकरांची खरेदीची लगबग सुरू झाली आहे. घरबसल्या वेबसाइटवर स्वस्त आणि आकर्षक आॅफरमुळे मुंबईकर मोठ्या प्रमाणात आॅनलाइन शॉपिंगकडे वळले आहेत. काही ठग अशाच स्वरूपाच्या बनावट वेबसाइटच्या माध्यमातून फसवणूक करत असून क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड फसवणुकीचे १९८ गुन्हे ९ महिन्यांत दाखल झाले आहेत. त्यामुळे आॅनलाइन शॉपिंग करा, पण जरा जपून, असे आवाहन मुंबई पोलीस सध्या करत आहेत.
नॅशनल क्राइम ब्युरोने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र सायबर गुन्ह्यांमध्ये आघाडीवर आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षी १८७९ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी ९४२ आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. २०१३ च्या तुलनेत याचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षी ६०४ गुन्हे दाखल केले होते. २०१३ च्या तुलनेत ही आकडेवारी चौपट आहे. यंदा ४ आॅक्टोबरपर्यंत तब्बल ५९८ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी १३४ ठगांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये १९८ गुन्हे हे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड फसवणुकीचे आहेत. सोर्स कोड टॅम्परिंगच्या ११, हॅकिंगच्या १०, फिशिंग आणि हॅकिंग फ्रॉडच्या ५ गुन्ह्यांचा समावेश आहे.

हे जरूर कराच !
आॅनलाइन खरेदी करताना वेबसाइट आणि कंपनीची तपासणी करावी, खातरजमा करावी. वस्तू पाठविणाऱ्या कुरियर कंपनीसह सर्व माहिती घ्यावी, खरेदी केलेल्या वस्तूंचे बिल भरताना बँक खात्याचा तपशील, डेबिट कार्ड / क्रेडिट कार्डचा पिन क्रमांक, पासवर्ड देऊ नये, तसेच आॅनलाइन खरेदीसाठी वापरलेल्या सर्व प्रक्रियेचा डेटा जतन करून ठेवावा. फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Shop online, but save ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.