लालबागमधील दुकानदारांना मिळणार संरक्षण
By admin | Published: April 15, 2017 02:05 AM2017-04-15T02:05:12+5:302017-04-15T02:05:12+5:30
लालबाग येथील जाम मिलमधील दुकानदाराना संरक्षण देण्याचे आश्वासन केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष पी.सी. वैश्य यांनी दिले आहे.
मुंबई : लालबाग येथील जाम मिलमधील दुकानदाराना संरक्षण देण्याचे आश्वासन केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष पी.सी. वैश्य यांनी दिले आहे.
जाम मिलमधील दुकानदारांवरील न्यायालयीन दावे मागे घेण्यात यावेत; विकास नियंत्रण कायद्याप्रमाणे त्यांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर, गोविंद मोहिते आणि अण्णा शिर्सेकर यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष पी.सी. वैश्य यांची भेट घेत केली होती. या मागणीची दाखल घेत संबंधितांना संरक्षण देण्यात येईल, असे आश्वासन वैश्य यांनी दिले असून, महामंडळ दुकानदारांचा सहानुभूतिपूर्वक विचार करेल, असेही म्हटले आहे. कामगारांची देणी देण्याबाबतही मार्ग काढण्यात येईल आणि सहा गिरण्यांच्या एकतृतीयांश जमीन कामगारांच्या घरांसाठी देण्यात येईल, असेही आश्वासन त्यांनी दिले. गिरण्यांच्या चाळीचा पुनर्विकास करण्यासाठी एनटीसीकडून प्रयत्न करण्यासह संबंधितांवर अन्याय होऊ देणार नाही, असेही भेटीदरम्यान नमूद करण्यात आले. (प्रतिनिधी)