फेरीवाल्यांच्या विरोधात दुकानदारांचे आंदोलन

By admin | Published: August 9, 2015 03:25 AM2015-08-09T03:25:06+5:302015-08-09T03:25:06+5:30

दुकानासमोरच फेरीवाल्यांकडून अनधिकृतरीत्या व्यवसाय केला जात असल्याने घाटकोपरमधील दुकानदारांनी शनिवारी चौथ्या दिवशी दुकाने बंद ठेवली. पालिकेने तत्काळ कारवाई न केल्यास

Shoppers' agitation against hawkers | फेरीवाल्यांच्या विरोधात दुकानदारांचे आंदोलन

फेरीवाल्यांच्या विरोधात दुकानदारांचे आंदोलन

Next

मुंबई : दुकानासमोरच फेरीवाल्यांकडून अनधिकृतरीत्या व्यवसाय केला जात असल्याने घाटकोपरमधील दुकानदारांनी शनिवारी चौथ्या दिवशी दुकाने बंद ठेवली. पालिकेने तत्काळ कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दुकानदारांनी दिला.
असल्फा गाव ते साकीनाका मोहिली गाव परिसरात किमान पाचशे दुकाने आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या दुकानांसमोरील रस्ता फेरीवाल्यांनी ताब्यात घेतला आहे.
फेरीवाल्यांमुळे अनेक ग्राहक दुकानात येणे टाळतात. या फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी दुकानदारांनी अनेकवेळा पालिका अधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली. मात्र केवळ थातूरमातूर कारवाई झाली.

Web Title: Shoppers' agitation against hawkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.