मुंबई : दुकानासमोरच फेरीवाल्यांकडून अनधिकृतरीत्या व्यवसाय केला जात असल्याने घाटकोपरमधील दुकानदारांनी शनिवारी चौथ्या दिवशी दुकाने बंद ठेवली. पालिकेने तत्काळ कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दुकानदारांनी दिला.असल्फा गाव ते साकीनाका मोहिली गाव परिसरात किमान पाचशे दुकाने आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या दुकानांसमोरील रस्ता फेरीवाल्यांनी ताब्यात घेतला आहे. फेरीवाल्यांमुळे अनेक ग्राहक दुकानात येणे टाळतात. या फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी दुकानदारांनी अनेकवेळा पालिका अधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली. मात्र केवळ थातूरमातूर कारवाई झाली.
फेरीवाल्यांच्या विरोधात दुकानदारांचे आंदोलन
By admin | Published: August 09, 2015 3:25 AM