मुंबईतील डॉक्टरच्या पैशांतून पॅरिसमध्ये शॉपिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 05:01 AM2018-09-10T05:01:59+5:302018-09-10T05:02:08+5:30

मुंबईतील एका डॉक्टरच्या पैशांतून पॅरिसमध्ये शॉपिंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Shopping in Paris from a doctor's money in Mumbai | मुंबईतील डॉक्टरच्या पैशांतून पॅरिसमध्ये शॉपिंग

मुंबईतील डॉक्टरच्या पैशांतून पॅरिसमध्ये शॉपिंग

Next

मुंबई : मुंबईतील एका डॉक्टरच्या पैशांतून पॅरिसमध्ये शॉपिंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये डॉक्टरला एक लाखाचा आॅनलाइन फटका बसला आहे. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सांताक्रुझ येथील रहिवासी असलेले संजीव उपाध्याय (४३) हे डोळ्यांचे डॉक्टर आहेत. १९ एप्रिल रोजी त्यांच्या मोबाइलवर २ वेगवेगळे ओटीपी आले होते. त्यांच्या एका खात्यातून २० हजार ६६१, तर दुसऱ्या खात्यातून ३७ हजार रुपयांचा आॅनलाइन व्यवहार करत मोबाइल खरेदी केल्याचा संदेश आला. आपण कुठलेही व्यवहार केले नसताना, हा प्रकार घडल्यामुळे त्यांना धक्का बसला. काही वेळातच, ९८ हजार ४५१ रुपये त्यांच्या खात्यातून गेल्याचा संदेश त्यांना आला. हा संदेश पॅरिसमधून आला होता.
बँकेने सांगितल्याप्रमाणे २३ एप्रिलला त्यांनी आॅनलाइन डिसप्यूट फॉर्म भरला. ४५ दिवसांनतर त्या बँकेकडून योग्य उत्तर मिळाले नाही. त्यांनी वारंवार याबाबत तक्रार केली. अखेर त्यांनी गावदेवी पोलिसांकडे धाव घेतली.

Web Title: Shopping in Paris from a doctor's money in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onlineऑनलाइन