थोडक्यात २
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:09 AM2021-09-10T04:09:38+5:302021-09-10T04:09:38+5:30
सोशल मीडियावर करिअर मार्गदर्शन लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई १०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान व इतर शाखेतील नवीन विषय कळावेत आणि ...
सोशल मीडियावर करिअर मार्गदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई
१०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान व इतर शाखेतील नवीन विषय कळावेत आणि त्यातल्या करियरच्या संधी सहज उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने माझा करियर गाइड हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी सोशल मीडियावर उभा केला आहे. याचा सकारात्मक वापर करण्यासाठी माझा करियर गाइड या पेजद्वारे करियरविषयी अधिकाधिक माहिती मिळणार आहे. कॉप्स विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड यांच्या पुढाकाराने या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. या पेजची सुरुवात येत्या ११ सप्टेंबर रोजी करियर इन माइक्रोबायोलॉजी या वेबिनारद्वारे होणार आहे. माझा करियर गाइड या फेसबुक पेजला जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी फॉलो करावे, असं आवाहन विधी पळसापूरे आणि अमर एकाड यांनी केले आहे.
---------
आयआयएम अहमदाबाद मॅनेजमेंट संस्थांमध्ये पहिल्या क्रमांकावर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद म्हणजेच आयआयएम अहमदाबाद ही देशातील सर्वोत्तम मॅनेजमेंट संस्था ठरली आहे. आयआयएम बंगळुरू दुसऱ्या क्रमांकावर आणि आयआयएम कोलकाता तिसऱ्या स्थानावर आहे. एनआयआरएफ रँकिंग २०२१ च्या मॅनेजमेंट रॅंकिंगमध्ये या संस्थांना हे रँकिंग मिळाले आहे. चौथे स्थान भारतीय प्रबंध संस्थान कोझिकोडला मिळाले आहे. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली ही संस्था एनआयआरएफ रँकिंग २०२१ च्या मॅनेजमेंट विभागात पाचव्या स्थानावर आहे.