‘पवित्र’मधून शिक्षक भरती नको
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई
शिक्षक भरतीतील गैरप्रकार थांबविण्यासाठी शासनाने पवित्र पोर्टल आणले; परंतु त्यास संस्थाचालकांकडून तीव्र विरोध होत आहे. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती बंद करा, अशी मागणी राज्य शिक्षण संस्था महामंडळाकडून करण्यात आली आहे. शासनाच्या प्रशासकीय पातळीवरून या प्रक्रियेत घोटाळा होण्याची शक्यताही उद्भवू शकते, असे त्यांनी म्हटले. खासगी शिक्षण संस्था या सेवाभावी संस्था असून, त्यातील कर्मचारी भरतीचा अधिकार हा त्या-त्या संस्थेचा आहे; परंतु मध्यंतरीच्या काळात पारदर्शक नोकर भरती या गोंडस नावाखाली शिक्षकांची लेखी परीक्षा घेऊन त्यातील गुणांच्या आधारे थेट भरतीचा प्रस्ताव शासनाने तयार केला आहे. पोर्टलवरील परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील यांनी पवित्र पोर्टलचा फेरविचार व्हावा, अशी मागणी केली.