Join us

थोडक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:06 AM

मुंबई : गावदेवीमध्ये २० वर्षीय तरुणाला व्हिडिओ गेम डीव्हीआर देण्याच्या बहाण्याने ५८ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली ...

मुंबई : गावदेवीमध्ये २० वर्षीय तरुणाला व्हिडिओ गेम डीव्हीआर देण्याच्या बहाण्याने ५८ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालिका कर्मचाऱ्याला गंडा

मुंबई : सीमकार्डची केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने नवी मुंबईतील ५३ वर्षीय पालिका कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातील ४६ हजार रुपयांवर सायबर ठगाने ऑनलाइन डल्ला मारला आहे. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात सायबर ठगांविरोधात बुधवारी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

रेल्वे कर्मचाऱ्याची फसवणूक

मुंबई : बँक खात्याची केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने एका ५६ वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातून ६ लाख ४० हजार रुपये लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल करून सर जे.जे. मार्ग पोलीस तपास करत आहेत.