Join us  

बारा डब्यांच्या लोकलला अल्पविराम

By admin | Published: April 24, 2016 3:02 AM

हार्बर मार्गावरील १२ डब्याच्या लोकलची चाचणी अयशस्वी ठरल्याने मध्य रेल्वेने सावध पवित्रा स्विकारत या सेवेला काहीसा ‘अल्पविराम’ दिला आहे. यापूर्वी तात्पुरता हा

मुंबई : हार्बर मार्गावरील १२ डब्याच्या लोकलची चाचणी अयशस्वी ठरल्याने मध्य रेल्वेने सावध पवित्रा स्विकारत या सेवेला काहीसा ‘अल्पविराम’ दिला आहे. यापूर्वी तात्पुरता हा मार्ग सुरु करुन निदान एका लोकलच्या सेवेचा आरंभ करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने मागे घेतला आहे. आता निदान १२ डब्यांच्या ८ ते ९ लोकल तयार झाल्यावर ही सेवा सुरु करणार असल्याची नवी भूमिका मध्य रेल्वे प्रशासनाने घेतली आहे. वस्तुत: अजूनही रेल्वे प्रशासनाची या मार्गांवरची कामे प्रलंबित असल्याने १२ डब्यांच्या लोकलसाठी प्रवाशांना आणखी बराच काळ वाट पहावी लागणार आहे. त्यात वडाळा प्लॅटफॉर्म क्रमांक एकची लांबी वाढवावी लागणार आहे. वडाळा येथील पादचारी पुलाला जागा नसल्याने अजून चार महिने काम सुरु राहिल. तर डॉकयॉॅर्ड फलाट क्रमांक दोनवर १२ डब्याच्या शेवटचा डबा फलाटाबाहेर राहतो. त्यामुळे येथे फलाट २.२५ मीटर इतके वाढवावे लागेल.मानखुर्दच्या प्लॅटफॉर्म क्र.३ वर जिथे गाड्या टर्मिनेट होऊन नव्याने सीएसटीच्या दिशेने नव्याने चालविल्या जातात, त्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवायची शिल्लक आहे. याविषयी, मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी सांगितले की, बारा डब्याची एक गाडी चालवून आम्ही बाकीच्या प्रवाशांचा हीरमोड करू शकत नाही. मध्य रेल्वेचे हार्बर मार्गावर डीसी ते एसी विद्युत परिवर्तनाचे काम पावसाळ््यापूर्वी पूर्ण होईल. त्यामुळे एका १२ डब्याच्या लोकलच्या केवळ १५ फेऱ्या होतात, मात्र एकदम अनेक लोकल सुरु केल्यास निदान ४० फेऱ्या तरी होतील.