मुंबई विमानतळ ते पुणे ‘शिवनेरी’ला अल्प प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 03:05 AM2020-02-01T03:05:02+5:302020-02-01T03:05:21+5:30
बोरीवली-विमानतळ-स्वारगेट या दरम्यान १७ फेऱ्यांचे नियोजन आहे.
मुंबई : मोठ्या दिमाखात सुरू केलेल्या मुंबई विमानतळ ते पुणे एसटी सेवेला आता थंड प्रतिसाद मिळत आहे. परिणामी, एसटीचे चाक आणखी तोट्याच्या खड्ड्यात रुतले आहे. डिसेंबरमध्ये असलेला प्रतिसाद जानेवारीमध्ये कमी झाला आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळामार्फत शिवनेरी (वातानुकूलित) बससेवा १६ डिसेंबरपासून छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ टर्मिनस-१ येथून पुणेसाठी सुरू झाली. बोरीवली-विमानतळ-स्वारगेट या दरम्यान १७ फेऱ्यांचे नियोजन आहे. या फेºयामधून १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या दरम्यान ६७० प्रवाशांनी प्रवास केला. त्यानंतर, १ ते १७ जानेवारी या दरम्यान ६०७ प्रवाशांनी प्रवास केला. मात्र, १८ जानेवारी ते २७ जानेवारी या दरम्यान फक्त ३३६ प्रवाशांनी प्रवास केला. निम्मे प्रवाशांनी मुंबई विमानतळ ते पुणे शिवनेरीच्या प्रवाशांनी पाठ फिरविली.विमानतळ ते पुणे आणि पुणे ते विमानतळ दररोज शिवनेरी बसच्या १७ फेऱ्यांचे नियोजन आहे. मात्र, या फेºयांना मिळणारा प्रतिसाद अत्यल्प आहे. १६ डिसेंबरपासून ते २७ जानेवारीपर्यंत १ हजार ६१३ प्रवाशांनी प्रवास केला.