Join us

‘नॉट रिपोर्टेड’चा अल्प प्रतिसाद

By admin | Published: July 29, 2016 3:44 AM

अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर, महाविद्यालयात प्रवेश निश्चित न केलेल्या ६० हजार ७९४ विद्यार्थ्यांना बुधवार व गुरुवारी प्रवेशाची आणखी

मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर, महाविद्यालयात प्रवेश निश्चित न केलेल्या ६० हजार ७९४ विद्यार्थ्यांना बुधवार व गुरुवारी प्रवेशाची आणखी एक संधी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिली होती. मात्र, सायंकाळी हाती आलेल्या माहितीनुसार, सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश निश्चित केले आहेत. एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत हा आकडा १० टक्क्यांहून कमी आहे.शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक महाविद्यालय किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले, ही माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाला गुरुवारी रात्री १२ वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे नेमक्या किती नॉट रिपोर्टेड विद्यार्थ्यांनी गुरुवारपर्यंत प्रवेश घेतले, त्याची माहिती शुक्रवारी कळेल. दरम्यान, बुधवारपासून गुरुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाच हजारांपर्यंत पोहोचली होती. म्हणजेच एकूण नॉट रिपोर्टेड विद्यार्थ्यांपैकी १० टक्क्यांहून कमी विद्यार्थ्यांनी दुसऱ्या संधीचा फायदा घेतलेला आहे.या आधी एकूण चार गुणवत्ता यादींत नाव आल्यानंतरही महाविद्यालयात ७० हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नव्हते. त्यांपैकी ६० हजार ७९४ विद्यार्थ्यांच्या जागा अद्याप रिक्त असल्याने, हे मेसेज पाठवल्याचे प्रशासनाने सांगितले. तरी मेसेज पाठवल्यानंतरही महाविद्यालय पसंत नसल्यास संबंधित विद्यार्थ्यांना तिसरी संधी मिळणार आहे. उच्च न्यायालयात धाव घेणारआवडते महाविद्यालय मिळाले नाही, म्हणून गुणवत्ता यादीत मिळालेल्या महाविद्यालयात बहुतेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नव्हता. नॉट रिपोर्टेड फेरीमध्ये दुसरे महाविद्यालय मिळेल, असा गैरसमज विद्यार्थ्यांना झाला होता. मात्र, शिक्षण विभागाने पाठवलेल्या मेसेजमध्ये पुन्हा त्याच महाविद्यालयाचे नाव पाहून विद्यार्थ्यांचा अपेक्षाभंग झाला. नाराजी व्यक्त करत, काही विद्यार्थ्यांनी विशेष फेरीमध्ये तरी आवडत्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी एक समिती तयार करत पाल्याला आवडते महाविद्यालय मिळाले नाही, तर उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही दिला आहे.नव्या महाविद्यालयाची प्रतीक्षा कायमवैद्यकीय आणि वैयक्तिक कारणास्तव बहुतेक विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश निश्चित करता आला नव्हता. याउलट काही विद्यार्थ्यांनी चुकीचा पसंतीक्रम दिल्याने, त्यांच्या वाट्याला दूरचे किंवा अधिक शुल्क असलेले महाविद्यालय आले होते. त्यामुळे पसंतीचे महाविद्यालय असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले असले, तरी आवडत्या महाविद्यालयाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने अधिक आहे. त्यामुळे विशेष फेरीसाठी अधिक अर्ज येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.मेसेज आल्यानंतरही प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि मेसेज न पाठवलेल्या सुमारे ९ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ९ आॅगस्ट रोजी नव्याने आॅनलाइन अर्जनोंदणी करायची आहे. त्यांच्यासाठी ९ ते १३ आॅगस्टदरम्यान विशेष फेरीचे आयोजन केले आहे.बोर्डपहिलीदुसरीतिसरीचौथीनॉट रिपोर्टेड(दु.३ पर्यंत)एसएससी६३,०५३१९,९२४१३,६५४६,५१६४,४६८सीबीएसई२,५७२४७५३२४१०२८४आयसीएसई३,६३५९५६४६३१७३१५०आयबी१००००आयजीसीएसई१५४८९४९१९९एनआयओएस७६५०१७१११३इतर२२४७०३४१७३०एकूण६९,७१५२१,५६४१४,५४१६,८३८४,७५४