मध्य रेल्वेवरील लोकल रद्द होण्याचं 'हे' आहे खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 01:42 PM2018-05-31T13:42:48+5:302018-05-31T13:42:48+5:30

गेल्या पाच दिवसात मध्य रेल्वे मार्गावरील लोकलच्या एकुण 40 फेऱ्या रद्द झाल्या.

SHORTAGE OF MOTORMEN LEADING TO CANCELLATION OF CR LOCALS EVERY DAY | मध्य रेल्वेवरील लोकल रद्द होण्याचं 'हे' आहे खरं कारण

मध्य रेल्वेवरील लोकल रद्द होण्याचं 'हे' आहे खरं कारण

Next

मुंबई- मध्य रेल्वेवर गेल्या काही दिवसांपासून लोकल रद्द होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. 27 मे रोजी मुख्य मार्गावरील 10 आणि हार्बर मार्गावरील 14 लोकल रद्द झाल्या. यामागील महत्त्वाचं कारण समोर आलं आहे. मोटारमॅनच्या कमतरतेमुळे लोकल रद्द होत असल्याचं मुंबई मिररने केलेल्या तपासात समोर आलं आहे. 

गेल्या पाच दिवसात मध्य रेल्वे मार्गावरील लोकलच्या एकुण 40 फेऱ्या रद्द झाल्या. मोटरमॅनच उपलब्ध नसल्याने या गाड्या रद्द करण्यात आल्या. पण, तांत्रिक बिघाडामुळे ट्रेन रद्द होत असल्याचं अधिकृत कारण रेल्वेकडून देण्यात आलं. मध्य रेल्वेतील सुत्रांच्या माहितीनुसार, उपनगरीय भागात मोटरमॅनपदाच्या जवळपास 20 टक्के जागा रिक्त आहेत. मोटारमॅनची पद एकुण 898 आहेत पण त्यापैकी फक्त 690 पदं भरली आहेत. दरम्यान, , मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक संजय कुमार जैन यांनी मात्र मोटरमॅन कमी असल्याचं फेटाळून लावलं. तर दुसरीकडे, मोटरमॅनची नाव असलेल्या एका यादीमध्ये 'मोटारमॅनची तीव्र कमतरला' असल्याने गाड्या रद्द होत असल्याचं स्पष्ट नमूद आहे.  

दरम्यान, मुख्य मार्गावर 10, हार्बर मार्गावर 14 ट्रेन मोटरमॅनच्या कमतरतेमुळे 27 मे रोजी रद्द झाल्या. 25 मे रोजी याच कारणाने 10 ट्रेन रद्द झाल्या. 26 मे रोजी 5, 28 मे रोजी पाच आणि 29 मे रोजी तीन गाड्या रद्द झाल्या. 
ऐन गर्दीच्या वेळी ट्रेन रद्द होत असल्याने रद्द झालेल्या ट्रेननंतर येणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दी वाढते आहे. ही वाढणारी गर्दी 4हजार प्रवाशांनी वाढते. कमी गर्दीच्या वेळी ट्रेन रद्द झाल्यावर त्यानंतर येणाऱ्या ट्रेनमध्ये 2000 प्रवाशांनी गर्दी वाढते. 

मोटरमॅन उन्हाळी सुट्टीवर गेले आहेत, हे मोटरमॅनच्या कमतरतेचं कारण आहे. 'काही मोटरमॅन सुट्टीवर आहेत. जे कामावर आहेत त्यांनी ओव्हर टाइम करायला नकार दिला आहे. याच कारणामुळे सेवेवर परिणा होतो आहे, अशी माहिती एका मोटरमॅनने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. 

Web Title: SHORTAGE OF MOTORMEN LEADING TO CANCELLATION OF CR LOCALS EVERY DAY

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.