Join us

आनंद दिघे साहेबांचे पाय धुताना एक तरी फोटो दाखवा; संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 4:03 PM

एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर संजय राऊत यांनीही निशाणा साधला आहे. 

मुंबई- राज्यातील जनतेने ज्या राष्ट्रवादीला हरवलं त्यांनाच शिवसेनेचे सत्तेत आणले. आता हीच राष्ट्रवादी शिवसेना संपवायला निघायली. आमच्या आमदारांनी करायचं काय? आमच्या पक्षप्रमुखांनी विचार करावा. किती काळ वाट बघत बसायची. थांबण्यालाही मर्यादा असतात, असं शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर म्हणाले. 

दीपक केसरकर यांच्यानंतर स्वत: मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीच्या हॉटेलबाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख आणि संजय राऊतांना थेट आव्हान दिलं. आमच्यासोबत ५० आमदार आहेत, ते सर्वजण आनंदात आहेत. मात्र, समोरच्यांकडून जो दावा केला जातो तो खोटा असून २१ आमदार संपर्कात असल्याचं सांगून ते दिशाभूल करत आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. तसेच संपर्कात असलेल्या आमदारांची नावेही जाहीर करा, असं आव्हान एकनाथ शिंदे यांनी दिलं. 

एकनाथ शिंदेंच्या या विधानानंतर संजय राऊत यांनीही निशाणा साधला आहे. स्वत:च्या फायद्यासाठी आनंद दिघे साहेबांच्या नावाचा वापर केला. त्यांनी आनंद दिघे साहेबांचे पाय धुताना एक तरी फोटो दाखवा. सिनेमा बघून शिवसैनिकांना सिनेमा बघून वाटलं की कर्मवीरांचे हे कर्मवीर आहे. परंतु हे डुब्लीकेट निघाले, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली. 

दरम्यान, एकीकडे संजय राऊत टीका करत असताना दूसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना आवाहन केलं आहे. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे , आपण या माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा .यातून निश्चित मार्ग निघेल. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शेवट गोड करा, सगळं सुरळीत होईल - शिंदे गट

जे २०-२१ आमदार संपर्कात आहेत तर नावं सांगा आजच पाठवून देतो. उगाच दिशाभूल करण्याचं राजकारण करू नका. राज्यातील जनतेने ज्या राष्ट्रवादीला हरवलं त्यांनाच शिवसेनेचे सत्तेत आणले. आता हीच राष्ट्रवादी शिवसेना संपवायला निघायली. आमच्या आमदारांनी करायचं काय? आमच्या पक्षप्रमुखांनी विचार करावा. किती काळ वाट बघत बसायची. थांबण्यालाही मर्यादा असतात. लेखी आवाहन केलय. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊ नका. बाळासाहेब ठाकरे हिंदुत्ववादी नेते होते. शेवट गोड करा. सगळं काही सुरळीत होऊ शकतं असं दीपक केसरकरांनी सांगितले. 

टॅग्स :एकनाथ शिंदेसंजय राऊतशिवसेनाउद्धव ठाकरे