प्राणिमित्रांनी बैल पाळून दाखवावा!, बैलगाडी शर्यतीवरून जुंपली, चर्चेचे आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 06:41 AM2017-09-20T06:41:44+5:302017-09-20T06:41:47+5:30

बैलगाडी शर्यतीला कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतरही काही प्राणिमित्र संघटना मुद्दामहून न्यायालयात जात आहेत. त्यामुळे कोणतीही अडचण असल्यास प्राणिमित्रांनी चर्चेसाठी यावे, नाही तर घरी बैल पाळून दाखवावा, असे आव्हान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.

Show life on the bullock carriage! | प्राणिमित्रांनी बैल पाळून दाखवावा!, बैलगाडी शर्यतीवरून जुंपली, चर्चेचे आमंत्रण

प्राणिमित्रांनी बैल पाळून दाखवावा!, बैलगाडी शर्यतीवरून जुंपली, चर्चेचे आमंत्रण

googlenewsNext

मुंबई : बैलगाडी शर्यतीला कायदेशीर मान्यता मिळाल्यानंतरही काही प्राणिमित्र संघटना मुद्दामहून न्यायालयात जात आहेत. त्यामुळे कोणतीही अडचण असल्यास प्राणिमित्रांनी चर्चेसाठी यावे, नाही तर घरी बैल पाळून दाखवावा, असे आव्हान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.
या वेळी संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण टाकळकर म्हणाले की, महाराष्ट्राला बैलगाडी शर्यतीची जुनी परंपरा आहे. बैलगाडी शर्यतीसाठी केलेल्या आंदोलनानंतर शेतकºयांच्या हितासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहांत कायदा मंजूर करून घेतला. दरम्यान, प्रत्येकाला हरकती नोंदवण्यास वेळ देण्यात आला होता. त्यानुसार आलेल्या हरकतींची दखल घेतल्यानंतरच कायदा संमत झाला. नव्या कायद्यात नवीन अटी व नियमावलींची वेसणही घालण्यात आली. मात्र तरीही काही स्वयंसेवी संघटना आणि प्राणिमित्र संस्थांनी नवीन कायदा व अटींना मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देत शर्यतींमध्ये पुन्हा अडथळा निर्माण केला आहे. परिणामी, तामिळनाडू व कर्नाटक राज्यांमध्ये बैलगाडी शर्यत चालू झाल्या असून महाराष्ट्रात त्या अजूनही बंद आहेत.
प्राणिमित्र संघटना आणि संस्थांना घोड्यांच्या शर्यती कशा चालतात, असा सवालही संघटनेने उपस्थित केला आहे. घोड्यांच्या शर्यतीत तर घोड्यावर बसून त्यांना पळवण्यासाठी मारहाणही केली जाते. याउलट बैलगाडी शर्यतीत बैलावर कोणीही बसत नाही किंवा मारहाण करत नाही. घोड्यांची रेस खेळणारा मालक घोड्याला स्वत: जवळ ठेवत नाही. याउलट बैलगाडी शर्यतीमधील बैलाला शेतकरी स्वत: सांभाळत असतो. त्यामुळे सर्व प्राणिमित्रांनी संघटनेसोबत चर्चा करून या मुद्द्यावर तोडगा काढण्याची विनंती आयोजकांनी केली आहे. अन्यथा प्राणिमित्रांनी शेतकºयांच्या घरातील बैल घरी नेऊन पाळून दाखवावा, असे आव्हान संघटनेने दिले आहे.
>घोड्यांची रेस खेळणर घोड्याला स्वत: जवळ ठेवत नाही. याउलट बैलगाडी शर्यतीमधील बैलाला शेतकरी स्वत: सांभाळतो. त्यामुळे प्राणिमित्रांनी संघटनेशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याची विनंती आयोजकांनी केली .

Web Title: Show life on the bullock carriage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.