Join us

#KamalaMillsFire: शो मस्ट गो आॅन..., माध्यमांच्या कार्यालयांचे नुकसान, पण काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 2:25 AM

मुंबई : शहरातील बहुतेक प्रसारमाध्यमांची कार्यालये लोअर परळच्या कमला मिल कम्पाउंडमध्ये आहेत.

मुंबई : शहरातील बहुतेक प्रसारमाध्यमांची कार्यालये लोअर परळच्या कमला मिल कम्पाउंडमध्ये आहेत. गुरुवारी रात्री लागलेल्या आगीमुळे त्यातील टीव्ही ९ अणि टाइम्स वाहिन्यांच्या प्रक्षेपणावर परिणाम झाला. मात्र शो मस्ट गो आॅन म्हणत पर्यायी यंत्रणा वापरत संबंधित प्रसारमाध्यमांनी आपल्या जागल्याची भूमिका योग्यरीत्या वठवली.या आगीमुळे टाइम्स नाऊ, मिरर, इटी, टीव्ही ९ आणि झूम टीव्ही या माध्यमांच्या कार्यालयांच्या कामकाजावर परिणाम झाला. त्यातल्या त्यात टीव्ही ९ वाहिनीच्या कार्यालयाचे सर्वाधिक नुकसान झाले. तर टाइम्स समूहाच्या कार्यालयांमध्ये धुराचे लोट पसरले होते. तथापि घटनांचे वृत्तांकन करण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी मिळेल त्या पर्यायी जागेत यंत्रणा उभी करून वाहिन्यांनी काम सुरू ठेवले. परिणामी कमला मिल अग्निकांडातही ‘शो मस्ट गो आॅन’चा प्रत्यय आला. आपत्कालीन परिस्थितीतही आपली जबाबदारी चोख बजावणाºया प्रसारमाध्यमांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ किती मजबूत आहे, याचा पुन्हा एक दाखला दिला आहे.

टॅग्स :कमला मिल अग्नितांडवकमलामिल्स