‘खड्डे दाखवा, पाचशे रुपये मिळवा’ बक्षीस योजना पुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:15 AM2019-11-16T00:15:49+5:302019-11-16T00:15:54+5:30

‘खड्डे दाखवा, पाचशे रुपये मिळवा’ या योजनेला मुंबईकरांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

 'Show pits, get five hundred rupees' reward scheme again | ‘खड्डे दाखवा, पाचशे रुपये मिळवा’ बक्षीस योजना पुन्हा

‘खड्डे दाखवा, पाचशे रुपये मिळवा’ बक्षीस योजना पुन्हा

googlenewsNext

मुंबई : ‘खड्डे दाखवा, पाचशे रुपये मिळवा’ या योजनेला मुंबईकरांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. दंडाच्या भीतीने अधिकारीही खड्डे बुजविण्यासाठी धावपळ करीत होते. त्यामुळे एका आठवड्यात १ हजार ७०० खड्डे बुजविण्यात आले. या प्रतिसादामुळे आठवड्याभराची ही योजना सुरू ठेवण्याचा
निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
१ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत पालिका प्रशासनाने ही योजना आणली. यासाठी अ‍ॅप सुरू करण्यात आले. यावर तक्रार केल्यानंतर २४ तासांच्या आत खड्डे न बुजविल्यास तक्रारदारांना पाचशे रुपये बक्षीस देण्यात आले. ही रक्कम अधिकाऱ्यांच्या खिशातून देण्यात येत आहे. या योजनेच्या आठवड्यात ९२ टक्के खड्डे २४ तासांच्या आत बुजविण्यात आले. मात्र १५५ खड्डे २४ तासांनंतर भरण्यात आल्यामुळे संबंधित तक्रारदारांना पाचशे रुपये देण्यात आले.
>सुरुवातीला ही रक्कम देण्यास टाळाटाळ करणाºया पालिका प्रशासनाने गेल्या चार दिवसांत तक्रारदारांना शोधून त्यांना बक्षिसाची रक्कम देण्यास सुरुवात केली आहे. त्यातील ३६ जणांनी बक्षिसाची रक्कम स्वीकारण्यास नकार दिला आहे. ही योजना बंद केल्यानंतरही या अ‍ॅपवर खड्ड्यांच्या तक्रारी सुरूच आहे. त्यामुळे ही योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पालिका अधिकाºयाने सांगितले.

Web Title:  'Show pits, get five hundred rupees' reward scheme again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.