एसएमएस दाखवा; वीज बिल भरा

By admin | Published: July 4, 2017 05:36 AM2017-07-04T05:36:09+5:302017-07-04T05:36:09+5:30

वीज बिलाबाबत महावितरणच्या वतीने ग्राहकांना मोबाइलवर देण्यात आलेल्या एसएमएसच्या आधारावर वीज बिल भरण्याची सुविधा महावितरणने

Show sms; Electricity bill paid | एसएमएस दाखवा; वीज बिल भरा

एसएमएस दाखवा; वीज बिल भरा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वीज बिलाबाबत महावितरणच्या वतीने ग्राहकांना मोबाइलवर देण्यात आलेल्या एसएमएसच्या आधारावर वीज बिल भरण्याची सुविधा महावितरणने राज्यभरातील ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.
राज्यभरातील सुमारे १ कोटी ३९ लाख वीज ग्राहकांनी आपल्या मोबाइल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे. या ग्राहकांना महावितरणच्या वीज बिलाचा तपशील एसएमएसद्वारे संबंधित मोबाइलवर पाठविण्यात येतो. राज्यभरातील अशा ग्राहकांना आता मोबाइलवरील एसएमएस दाखवून महावितरणच्या वीज बिल भरणा केंद्रात वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात
आली आहे.
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी १८००२००३४३५ / १८००२३३३४३५ / १९१२० या टोल फ्री क्रमांकांसह महावितरणच्या मोबाइल अ‍ॅप अथवा महावितरणच्या संकेतस्थळावर मोबाइल क्रमांकाची नोंदणी करावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Show sms; Electricity bill paid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.