Join us

हेगडेंचे वक्तव्य म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी दर्शवणारे, बाळासाहेब थोरातांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2020 1:57 PM

अनंतकुमार हेगडे उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. 

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. गांधीजींच्या नेतृत्वाखाली लढला गेलेला स्वातंत्र्य लढा नाटकी होता, असे अनंतकुमार हेगडे यांनी म्हटले आहे. यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अनंतकुमार हेगडे यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे. 

अनंतकुमार हेगडे यांचे वक्तव्य निंदनीय असून यावरून भाजपा नेतृत्वातील बौद्धिक दिवाळखोरी दिसून येते, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. याचबरोबर, ब्रिटिशांची दलाली करून स्वातंत्र्यलढ्याला विरोध करणाऱ्यांना स्वातंत्र्यलढा नाटक वाटू शकतो. यांच्या पूर्वजांनीही ब्रिटिशांशी हातमिळवून स्वातंत्र्यलढ्याला कायम विरोधच केला, हाच खरा भाजपाचा चेहरा आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगत भाजपावर हल्लाबोल केला आहे. 

दरम्यान, बंगळुरूतील एका कार्यक्रमावेळी अनंतकुमार हेगडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महात्मा गांधींचा स्वातंत्र्यलढा हा ब्रिटीश सरकारच्या संमती आणि पाठिंब्याने रचला गेला होता. या तथाकथित नेत्यांनी एकदाही पोलिसांचा मार खाल्ला नव्हता. ही खरीखुरी लढाई नव्हती. हा परस्पर संगनमताने रचलेला स्वातंत्र लढा होता, असे वक्तव्य अनंतकुमार हेगडे यांनी केले. अनंतकुमार हेगडे उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या 

मनसेच्या प्रस्तावित मार्गाला पोलिसांनी नाकारली परवानगी, आता या मार्गावरून निघणार मोर्चा

आमची हातमिळवणी खुपते, पण पक्ष फोडून आलेले चालतात; भाजपाला उद्धव ठाकरेंचा टोला

'...तर असं हिंदुत्व स्वीकारायला तयार नाही'; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

...अन् उद्धव ठाकरे कात्रीत सापडले; सांगितला युतीत ओढवलेला प्रसंग

महात्मा गांधींचा स्वातंत्र्य लढा नाटकी होता; भाजपा खासदाराचे वक्तव्य

टॅग्स :बाळासाहेब थोरातअनंतकुमार हेगडेमहात्मा गांधीभाजपाकाँग्रेस