Shraddha Walker Murder Case: श्रद्धा हत्याकांड प्रकरणी 'या' व्यक्तीची निवड करा; ठाकरे गटाकडून मागणी, देवेंद्र फडणवीस ऐकणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 05:15 PM2022-11-18T17:15:59+5:302022-11-18T17:16:32+5:30
Shraddha Walker Murder Case: श्रद्धा आणि आरोपी आफताब दोघेबी वसईतील रहिवाशी होते. त्यामुळे या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटत आहे.
मुंबई- संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा हत्याकांड (Shraddha Walker Murder Case) प्रकरणी एकामागून एक नवीन खुलासे होत आहेत. हत्या करणारा आरोपी आफताब अमीन पूनावालाची (Aftab Poonawalla) क्रूरता पाहून सर्वांनाच हादरवून सोडले आहे. आफताबची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
सतत हसतोय अन् म्हणतोय एकाच गोष्टीचाच पश्चाताप वाटतोय; आफताबचा पोलिसांना जबाब
श्रद्धा आणि आरोपी आफताब दोघेबी वसईतील रहिवाशी होते. त्यामुळे या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटत आहे. याचदरम्यान ठाकरे गटातील नेत्या निलम गोऱ्हे यांनी एक महत्वाची मागणी केली आहे. श्रद्धा हत्याकांड प्रकरणात दिल्ली पोलिसांना कायदेशीर मदत करण्यासाठी उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी शिफारस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करणार असल्याचं निलम गोऱ्हे यांनी सांगितलं.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सदर घटना खूप दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. श्रद्धा वालकरची हत्या दिल्लीत झाली आहे. ही खूप दुर्दैवी घटना आहे. दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
श्रद्धाने आफताबला फोनवर एका मुलीशी बोलताना ऐकलं अन्...; मोठं गूढ उलघडलं!
दरम्यान, आफताबने चौकशीदरम्यान सांगितले की, श्रद्धाने त्याला फोनवर एका मुलीशी बोलताना ऐकले होते, त्यानंतर दोघांमध्ये मोठे भांडण झाले होते. आफताबची २० पेक्षा जास्त महिलांसोबत मैत्री होती. या सर्वांसोबत एका डेटिंग अॅपवरुन मैत्री झाली होती. तसेच यामधील अधिक महिलांसोबत त्यांने शारिरीक संबंध ठेवले होते. स्वत: आफताबने याबाबत खुलासा केला आहे.
आफताब आणि श्रद्धा यांच्यात दररोज भांडण व्हायचे. १८ मे रोजी देखील दोघांमध्ये मोठं भांडण झालं. मात्र हे भांडण श्रद्धाच्या आयुष्यातील शेवटचं ठरलं. १८ मे रोजी मुंबईच्या घरातील सामान दिल्लीत आणण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. घराचा खर्च कोण सांभळणार यावरुनही भांडण झालं. श्रद्धा वारंवार घरातील खर्चाबाबत बोलत असल्याने आफताबला राग अनावर झाला. त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि गळा दाबून श्रद्धाची हत्या केल्याचं आफताबने सांगितलं.
फोटोला ‘हॅपी डेज’ कॅप्शन-
श्रद्धा वालकर इन्स्टाग्रामवर फारशी सक्रिय नव्हती. तिच्या हत्येच्या एक आठवडा आधी, तिने हिमाचल प्रदेशमध्ये स्वतःचे पुस्तक वाचतानाचे छायाचित्र पोस्ट केले होते. १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी तिने आफताबसोबत एक फोटो पोस्ट केला आणि त्याला कॅप्शन दिले ‘’हॅपी डेज’’. आफताबसोबत तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा एकमेव फोटो होता.