नृत्याविष्काराने उलगडणार ‘श्रावणसखी’चे रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 05:28 AM2018-08-27T05:28:44+5:302018-08-27T05:28:49+5:30

श्रावण महिना अधिकाधिक बहारदार आणि रंगतदार करण्यासाठी ‘लोकमत सखी मंच’तर्फे ‘श्रावणसखी’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

'Shravanashikhi' color will be unveiled by dance-drama | नृत्याविष्काराने उलगडणार ‘श्रावणसखी’चे रंग

नृत्याविष्काराने उलगडणार ‘श्रावणसखी’चे रंग

googlenewsNext

मुंबई : श्रावण महिना अधिकाधिक बहारदार आणि रंगतदार करण्यासाठी ‘लोकमत सखी मंच’तर्फे ‘श्रावणसखी’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार, २८ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजता दादर येथील शिवाजी नाट्य मंदिरात हा कार्यक्रम पार पडेल. या वेळी श्रावणातील सणवार नृत्याविष्कारांतून सादर करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, यात हळदीकुंकू कार्यक्रम होणार आहे. त्यात सर्व सखींना वाण देण्यात येणार आहे. पु.ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेड हे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत.

सोने, चांदी व हिऱ्यांच्या दागिन्यांच्या व्यवसायातील एक विश्वासार्ह ब्रॅँड म्हणून पु.ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेडची ओळख आहे. महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक ही तीन राज्ये मिळून देशपातळीवर दालनांची एकूण संख्या २५ असून त्यात वर्षभरात वाढ होणार आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी पु.ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेडने दागिने आॅनलाइन खरेदीची सुविधा आॅनलाइनपीएनजी नावाने उपलब्ध केली आहे. सध्या गाडगीळांची सहावी पिढी या व्यवसायात असून शुद्धता, पारदर्शकता आणि ग्राहकाभिमुख सेवा या त्रिसूत्रीवर कार्यरत आहे. आगामी सण-उत्सवांचा कालावधी लक्षात घेऊन सोने व हिºयांच्या दागिन्यांची नवी कलेक्शन बाजारात येणार आहेत. हिंदीसह अनेक मराठी सिनेमा-नाटकांसाठी पु.ना. गाडगीळ आणि सन्स लिमिटेडने दागिने घडविले आहेत.
आतुरालय लाइफ मॅनेजमेंट हे कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत. मोहन गोखले यांनी सुरू केलेल्या या आतुरालयच्या माध्यमातून वास्तुशास्त्राचे धडे गिरविले जातात, तसेच गैरसमज दूर केले जातात. २००० साली याची सुरुवात झाली. या संस्थेतर्फे अंतर्लीन ही कार्यशाळाही राबविली जाते. . ज्या वास्तूत आपण राहतो ती वास्तू आपल्याला तथास्तू म्हणते, अर्थात आशीर्वाद देते. आपण बोलतो ते सांभाळून बोललो तर परिणाम चांगले मिळतात.
‘अविरत आॅथेन्टीक स्पाइस’ हे या कार्यक्रमाचे गिफ्ट पार्टनर आहेत. २०१३ साली अविरत महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था स्थापन करून, अधिकाधिक महिलांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. यांचे वैशिष्ट्य म्हणजे मालवणी, घाटी , गोवन, आगरी, सांबार, छोले, चाट मसाला, धने पावडर, मिरची, हळद पावडर इ. मसाले बनवतात. तसेच चकली पीठ, मालवणी वडे, आंबोळी, थालीपीठ तयार केली जातात. तसेच मेथी, पालक, कोबीचे रेडी टू कूक पराठा मिक्स प्रॉडक्ट्स तयार केली जातात. महिलांसाठी उद्योग संधी म्हणून कमिशन तत्त्वावर अविरत मसाले विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
या कार्यक्रमात ‘स्पर्श संस्कृतीचा’ या मराठी वाद्यवृंदाच्या माध्यमातून मंगळागौरी, पारंपरिक नृत्य, दिंडी, गवळण यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. संतोष शिर्सेकर यांची संकल्पना व दिग्दर्शन असलेल्या या कार्यक्रमाच्या संयोजिका विशाखा शिंदे आहेत, तर संगीत संयोजक वल्लभ शिंदे यांनी केले आहे. मुग्धा, संकेत, पूजा, अमित, सुशील हे सहायक म्हणून काम पाहतील. नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी संतोष आणि अभिजीत यांची असणार आहे.

तारीख - २८ आॅगस्ट,
मंगळवार
च्स्थळ - शिवाजी नाट्यमंदिर, प्लाझा सिनेमासमोर, दादर (प.)
च्वेळ - दुपारी ३ वाजता
च्अधिक माहितीसाठी संपर्क - ८६५२२००२२१

Web Title: 'Shravanashikhi' color will be unveiled by dance-drama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.