Join us

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांचे आगमन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 5:22 AM

मुंबापुरीत आता गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले आहेत. श्रावण सुरू असल्याने व गणेश चतुर्थी जवळ येत असल्याने, मुंबई शहर आणि उपनगरात

मुंबई - मुंबापुरीत आता गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले आहेत. श्रावण सुरू असल्याने व गणेश चतुर्थी जवळ येत असल्याने, मुंबई शहर आणि उपनगरात ‘श्री’चे आगमन होत आहे. रविवारी ताडदेवचा राजा, अखिल चंदनवाडी, स्लेटर रोड, खेतवाडी सहावी गल्ली, करी रोडचा राजा, बाल गणेश मंडळ या गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचे मंडपात ढोलताशांच्या गजरात आगमन झाले.रविवारी रक्षाबंधन साजरे होत असतानाच, दुपारनंतर ठिकठिकाणी गणेशाचे आगमन होण्यास सुरुवात झाली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मूर्तींच्या कारखान्यात एकत्र येत ढोलताशांचा गजर सुरू केला, शिवाय बाप्पाचा जयघोष करत गणेशमूर्ती वाहनावर विराजमान केली. ढोलताशांच्या गजरात रात्री उशिरा गणेशमूर्ती मंडपांत दाखल झाल्या.दरम्यान, ताडदेवच्या राजासह इतर सर्व ठिकाणांच्या आगमन सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. इतर ठिकाणीही हाच आनंद पाहण्यास मिळाला. दरम्यान, आता पुढील रविवारीही मोठ्या गणेशमूर्तींचे आगमन होणार असून, यासाठी मंडळे सज्ज झाली आहेत, तर दुसरीकडे दहीहंडीचाही उत्साह शहरात पसरला आहे.

टॅग्स :मुंबईगणेशोत्सवगणपती