Join us

वझीरा नाका येथील श्री स्वयंभू गणेश देवस्थानने मंत्री सहाय्यनिधीला दिले ५१ लाख रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 2:43 PM

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार  सर्वच स्तरातून अनेक मदतीचे हात पुढे येत आहे.

मुंबई- जगभरात कोरोनामुळे हाहाकार उडाला असतांना,देशात,राज्यात व शहरात सर्वच व्यवहार व जनजीवन ठप्प झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार  सर्वच स्तरातून अनेक मदतीचे हात पुढे येत आहे.यामध्ये सार्वजनिक गणेशोतोसव मंडळे सुद्धा मागे नाहीत.

बोरिवली ( प) , वझीरा नाका येथील श्री स्वयंभू गणेश देवस्थानातर्फे ' मुख्यमंत्री सहाय्य निधी ' कोविड - १९ निधीस रु ५१ लाख रुपयांची देणगी देण्यात आली.मुख्यमंत्री सहायता निधीच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या खात्यात ही रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात आल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त व माजी नगरसेवक विजय दारुवाले यांनी लोकमतला दिली.

याप्रसंगी विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस,विजय दारुवाले,मंडळाचे अध्यक्ष नितीन पाटील,खजिनदार नरेश भोईर,विश्वास रावते,विजय रावले,सी.एस.भंडारी,विशाल केणी,शशिकांत वैती,मंडळाचे व्यवस्थापक भालचंद्र भंडारी,तसेच शाखाप्रमुख विपुल दारुवाले उपस्थित होते.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमहाराष्ट्र सरकार