घटत्या हरितपट्टय़ाचा बसतोय पक्ष्यांना फटका!

By admin | Published: November 23, 2014 12:51 AM2014-11-23T00:51:54+5:302014-11-23T00:51:54+5:30

सांडपाण्याचे प्रदूषण, वेगवान शहरीकरण अशा अनेक कारणांमुळे मुंबईतील पक्षी अधिवास धोक्यात आले आहेत.

Shrubs of falling green potted birds! | घटत्या हरितपट्टय़ाचा बसतोय पक्ष्यांना फटका!

घटत्या हरितपट्टय़ाचा बसतोय पक्ष्यांना फटका!

Next
मुंबई : पायाभूत प्रकल्पांमुळे झालेले पर्यावरणाचे नुकसान, बिघडलेला असमतोल, लोकविरोधी संवर्धन धोरणो, औद्योगिक तसेच सांडपाण्याचे प्रदूषण, वेगवान शहरीकरण अशा अनेक कारणांमुळे मुंबईतील पक्षी अधिवास धोक्यात आले आहेत. शिवाय हिवाळा सुरू होते क्षणी मुंबईत स्थलांतरित होणा:या पक्ष्यांचे प्रमाण यापूर्वी अधिक होते. मात्र येथील ‘ग्रीनपॅच’देखील संपुष्टात येत असून, वाढत्या प्रदूषणामुळे स्थलांतरित पक्ष्यांसह स्थानिक पक्ष्यांनाही त्याचा फटका बसू लागला आहे.
मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे कॉलनी, विक्रोळी पार्कसाइट, दादर हिंदू कॉलनी, आयआयटी पवई, मलबार हिल, रेसकोर्स, राणीबाग इत्यादी ठिकाणी युरोप, आफ्रिका, आशिया खंडातील अनेक स्थलांतरित पक्षी दिसत होते. मात्र वाढते शहरीकरण, वाढते प्रदूषण आणि इतर अनेक कारणांमुळे स्थलांतरित पक्षी येण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबई शहर आणि उपनगरात झाडे लावण्याचा सपाटा सरकारी आणि संस्थांकडून सुरू आहे. मात्र ही झाडे येथील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी फायदेशीर आहेत की नाहीत? याचा विचार केला जात नाही. गेल्या सातएक वर्षाचा विचार करता मुंबई शहर आणि उपनगरातील गुलमोहरांच्या वृक्षांचे प्रमाण वाढते आहे. परंतु अशा वृक्षांमुळे येथील पर्यावरणाचा समतोल राखला जातो की नाही? याचा विचार केला जात नाही. 
मुंबईतील पर्यावरणाचा विचार करता येथील ‘ग्रीनपॅच’ संवर्धनासाठी आंबा, पिंपळ, उंबर, वड अशा झाडांची लागवड करत त्यांची जोपासना करणोदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण ही झाडे पक्ष्यांच्या संवर्धनासाठी महत्त्वाची असून, असे झाले तर युरोप आणि सैबेरियातील पक्षी मुंबईच्या दिशेने कूच करतील, असे पक्षितज्ज्ञांचे म्हणणो आहे. (प्रतिनिधी) 
 
फ्लेमिंगो दोन जातीचे असतात. लेसर फ्लेमिंगो म्हणजेच छोटे रोहित. ग्रेटर फ्लेमिंगो म्हणजेच मोठा रोहित. कच्छच्या रणामध्ये त्यांची हजारो घरटी आढळतात. विणीच्या हंगामात म्हणजे पावसाळ्यात ते कच्छमध्ये वास्तव्यास असतात. तर पिल्ले झाल्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ते शिवडी-माहुल, ऐरोली गाठतात. मात्र येथील पाणथळी नष्ट होत आल्याने इथे येणा:या फ्लेमिंगोंची संख्या घटत आहे. रासायनिक द्रव्य खाडीत सोडले जात असल्याने शिवडी-माहुल येथील प्रदूषण वाढत आहे. या प्रदूषणाची एक विशिष्ट पातळी ओलांडली गेल्यास इथे फ्लेमिंगो येणार नाहीत. 
- विजय अवसरे (निसर्गमित्र)
 
मुंबईत हिवाळ्यात दोन प्रकारचे पक्षी येतात. एक समुद्रकिना:यावरचे तर दुसरे म्हणजे ग्रीनपॅच परिसरात वावरणारे. या ग्रीनपॅचमध्ये मध्य भारताबरोबर आशिया, आफ्रिका आणि युरोपातून पक्षी येतात. मुंबईत सुमारे 35क् प्रकारचे पक्षी हिवाळ्यात आढळत होते. त्यापैकी 4क् टक्के स्थलांतरित पक्षी होते. आता पक्ष्यांच्या केवळ 3क् ते 4क् प्रजातीच दिसतात. त्यामुळे नवे ग्रीनपॅच तयार करण्यास स्थानिक झाडांना प्राधान्य दिले पाहिजे.
- संजय शिंगे (पर्यावरणवादी)
 
मुंबईत रहदारी आणि सौंदर्य यांना अधिक महत्त्व दिले जाते. परिणामी परदेशी वृक्षांची अधिक लागवड केली जाते. रेन ट्री, गुलमोहर आणि सोनमोहर अशी विदेशी झाडे मुंबईत अधिक आहेत. मात्र त्याचा पक्ष्यांच्या जीवनावर परिणाम होतो आहे.
परदेशी झाडांवर कीटक आढळत नाहीत, त्यामुळे कीटकांवर जगणारे पक्षी तिकडे फिरकत नाहीत; शिवाय रेन ट्रीच्या घेरामुळे पक्षी तेथे बसतात, मात्र घरटे बांधत नाहीत, असे निरीक्षण पक्षी निरीक्षकांनी नोंदवले आहे. 

 

Web Title: Shrubs of falling green potted birds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.