Join us

राज्यभरातील शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 5:30 AM

सरकारी कर्मचाऱ्यांच्या तीन दिवसीय संपाच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी राज्यभरातील शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता.

मुंंबई : सरकारी कर्मचाऱ्यांच्या तीन दिवसीय संपाच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी राज्यभरातील शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. शाळा, महाविद्यालयांचे कामकाज मात्र सुरळीत सुरू राहिले. काही ठिकाणी वैद्यकीय सेवेवर परिणाम झाला असला तरी सरकारी रुग्णालयांमध्ये तातडीच्या सेवा सुरळीत सुरू होत्या.संपाला मराठवाड्यात चांगला प्रतिसाद मिळाला. महसूल यंत्रणेच्या १६ हजारपैकी १५ हजारांहून अधिक कर्मचारी संपावर गेल्याचा दावा राज्य मध्यवर्ती महसूल कर्मचारी संघटनेने केला आहे. स्टेट जीएसटी विभागातील १४५ व कृषी विभागातील २००पेक्षा अधिक तृतीय व चतुर्थ कर्मचारी व वाहनचालक संपात सहभागी झाले होते.बीडमध्ये संपात सहभागी न झालेल्या दोन कार्यालयांतील वर्ग-३ आणि वर्ग-४च्या कर्मचाºयांना बांगड्यांचा अहेर देण्यात आला.जळगावला सार्वजनिक बांधकाम व इतर काही कार्यालयांचा अपवाद वगळता जिल्ह्यातील १३६०पैकी एकूण ११०० कर्मचारी संपात सहभागी झाले. धुळ्यात सरकारी कार्यालये व शाळा ओस पडल्याचे चित्र पाहावयास मिळाले. नंदुरबार जिल्ह्यातही जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट होता़नाशिकलाही संपाचा परिणाम जाणवला. जिल्ह्यात सुमारे दहा हजार माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांनी संपात सहभाग घेतला. अहमदनगर जिल्ह्यातही संपाचा परिणाम जाणवला.>उपराजधानीत रुग्णसेवेला फटकाउपराजधानी नागपुरात संपाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. संपाचा फटका बसल्याने दिवसभर रुग्णसेवा कोलमडली होती. बहुतांश शाळांमध्ये सुटीचे वातावरण होते. नागपुरातील संविधान चौकात सरकारी कर्मचाºयांनी आंदोलन केले. अमरावती, गडचिरोली गोंदिया, यवतमाळ, वर्धा, भंडारा आणि चंद्रपूर या विदर्भातील जिल्ह्यातील सरकारी कार्यालये ओस पडली होती.>वºहाडातही सरकारीकामकाज ठप्पवºहाडातील अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यांमधील सरकारी कामकाज ठप्प होते. वाशिमच्या आरोग्य कर्मचाºयांनी काळ्या फिती लावून काम केले. बुलढाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचाºयांनी द्वारसभा घेतली.पश्चिम महाराष्ट्रातही संप यशस्वी झाला. पुणे विभागीय आयुक्तालयासह महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातही अशीच परिस्थती होती. सोलापूर शहर व जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.कोल्हापुरात मंगळवारी सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीतर्फे तीन दिवसांचा संप पुकारण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून कर्मचारी व शिक्षकांनी टाऊन हॉल ते बिंदू चौक असा मोर्चा काढून सरकारचा निषेध नोंदविला.