सातपाटीतील नौकेचे खडकावर आदळून नुकसान
By admin | Published: December 9, 2014 11:02 PM2014-12-09T23:02:20+5:302014-12-09T23:02:20+5:30
सातपाटी खाडीमध्ये साचलेला प्रचंड गाळ, मच्छीमारामध्ये पडलेले गटतट आणि शासकीय अधिका:यावर ठेकेदाराचे असलेले वर्चस्व याचा मोठा फटका सातपाटी-मुरबे खाडीला बसत आहे.
Next
पालघर : सातपाटी खाडीमध्ये साचलेला प्रचंड गाळ, मच्छीमारामध्ये पडलेले गटतट आणि शासकीय अधिका:यावर ठेकेदाराचे असलेले वर्चस्व याचा मोठा फटका सातपाटी-मुरबे खाडीला बसत आहे. त्यामुळे खाडीतील समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या मच्छीमारांची एक नौका आज पहाटे मासेमारीला जात असताना भरकटून खडकावर आदळली. या अपघातात नौकेचे मोठे नुकसान झाले असून काही दिवस ही नौका अपघातस्थळी अडकून पडण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
सातपाटी-मुरबे खाडी मागील काही वर्षापासून अनेक समस्यांनी ग्रासली असून मच्छीमारांना आपला व्यवसाय करणो कठीण होऊन बसले आहे. खाडीतील गाळ काढणो, खडक फोडणो इ. कामे मंजूर झाली तरी पूर्ण करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे खाडीतील गाळ काढण्याचा ठेका दिलेल्या मालदार कंपनीचे बार्ज मच्छीमारामधील मतभिन्नतेमुळे गाळ न काढताच पुन्हा माघारी परतले आहेत. मेरीटाईम बोर्डाच्या अधिका:यासमवेत झालेल्या बैठकीत काही मच्छीमार प्रतिनिधी आपापली उणीदुणी व आरोप प्रत्यारोप करण्यातच धन्यता मानीत असल्याने याचा फायदा ठेकेदार, शासकीय अधिकारी उचलीत आहेत. त्यामुळे खाडी दिवसेंदिवस समस्याग्रस्त बनत चालली आहे.
खाडीच्या नौकानयन मार्गात गाळ साचून पश्चिम-उत्तरेला धोकादायक खडकांची मोठी रांग निर्माण झाली आहे. नौका मासेमारीला समुद्रात जाताना जेवढे धोके उद्भवत नाहीत त्यापेक्षा जास्त धोक्याचा सामना या नौकानयन मार्गातून प्रवास करताना आम्हाला करावा लागत असल्याचे उमेश मेहेर या मच्छीमाराने लोकमतला सांगितले.
आज पहाटे सातपाटीच्या यशवंत नारायण तरे यांची जय एकवीरा ही नौका मासेमारीला निघाली असता मार्गातील धोक्याचा अंदाज न आल्याने भरकटत खडकावर अडकून पडली आहे.
(वार्ताहर)
अत्यंत धोकादायक अवस्थेत पहाटे दोन वाजल्यापासून ही नौका अडकून पडल्याने व अपघातस्थळी मदतकार्य पोहचवणो कठीण असल्याने नौकामालक धास्तावला आहे.
आज रात्री येणा:या भरतभ्च्या प्रवाहात जर ही नौका बाहेर काढण्यात अपयश आल्यास पुढील चार ते पाच दिवस ओहटीच्या पाण्याच्या प्रवाहाने ती निघू शकणार नसल्याचे उपस्थित मच्छीमारांनी सांगितले.