मुंबईकर अनुभवणार ‘शटल टाईम’
By admin | Published: February 21, 2017 03:41 AM2017-02-21T03:41:54+5:302017-02-21T03:41:54+5:30
महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या वतीने शालेय खेळाडूंना बॅडमिंटन प्रशिक्षणासाठी शटल टाईम कार्यक्रमाचे
मुंबई : महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या वतीने शालेय खेळाडूंना बॅडमिंटन प्रशिक्षणासाठी शटल टाईम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत २१ ते २३ फेबु्रवारी या तीन दिवसांच्या कालावधीत ही कार्यशाळा पार पडणार आहे.
५ ते १५ वयोगटांतील मुलांना कार्यशाळेंतर्गत बॅडमिंटनचे धडे देण्यात येणार आहे. मुंबईसह पुण्यात देखील ही कार्यशाळा २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमांतर्गत स्थानिक बॅडमिंटन प्रशिक्षकांसह शाळेतील शारिरीक शिक्षणाच्या शिक्षकांना बॅडमिंटन प्रशिक्षणाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकवले जाणार आहे. शालेय स्तरावरील खेळाडूंना प्रात्यक्षिकांसह आॅडियो, व्हिडीओच्या माध्यमाने बॅडमिंटन खेळाचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. (क्रीडा प्रतिनिधी)