Join us  

सायन रुग्णालयात जन्मले सयामी जुळे

By admin | Published: July 28, 2016 10:27 PM

सायन रुग्णालयात गुरुवारी सकाळी एक शरीर आणि दोन तोंड असलेल्या बाळांचा जन्म झाला.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - सायन रुग्णालयात गुरुवारी सकाळी एक शरीर आणि दोन तोंड असलेल्या बाळांचा जन्म झाला. साईन खान या महिलेने या बाळांना जन्म दिला असून, सध्या बाळ आणि बाळंतीण दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. 
एक शरीर आणि दोन तोंड असलेले हे बाळ ‘सयामी जुळे’ आहे. यातील एका बाळाची पूर्णत: वाढ झालेली आहे. तर दुसऱ्या बाळाचे तोंड, छाती आणि पोटाकडचा भाग पूर्ण वाढ झालेल्या बाळाला चिकटलेला आहे. या बाळाला दोन तोंडे आणि तीन हात आहेत. सध्या बाळांच्या प्रकृतीचा विचार करता कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया करणे धोकादायक ठरू शकते, त्यामुळे सध्या शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या बाळांना सध्या विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आलेले आहे. 
एकाच बाळाला वाचवणे शक्य
बाळाला एकच हृदय असल्याने एकाच बाळाला वाचवणे शक्य होणार आहे. बाळ आणि बाळंतीण सुखरुप असली तरी बाळाची प्रकृती स्थिर होईपर्यंत शस्त्रक्रिया करण्यात येणार नाही. यासाठी किमान आठवडा तरी थांबावे लागेल.
-डॉ. पारस कोठारी, पिडियाट्रिक सर्जन, सायन रुग्णालय