लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई-गोरेगाव पश्चिम सिद्धार्थ रुग्णालय आवारात असलेले शवविच्छेदन केंद्र गणेशोत्सवमध्ये अचानकपणे बंद करण्यात आले. या शवविच्छेदन केंद्रमध्ये गोरेगाव, मालाड, बांगुर नगर,आरे वनराई, दिंडोशी मधील लोकांचा शवविच्छेदन करण्याकरिता उपयोगी पडत होते.परंतू अचानकपणे बंद केल्यामुळे त्या विभागातील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.शव येऊन परत जातांना दुःखीत कुटुंबाचे खूप हाल होत आहेत.तसेच सदर शवविच्छेदन केंद्र बंद असल्याने त्याचा अतिरिक्त भार बोरीवलीच्या भगवती हॉस्पिटल आणि विलेपार्ल्याच्या कूपर हॉस्पिटलवर पडत आहे.
सदर शवविच्छेदन केंद्र तत्काळ सुरू करण्यात यावे असे निवेदन सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये उपस्थित संबंधितांना दिले.जे.जे.हॉस्पिटलमधील पोलीस शल्यचिकित्सक यांच्या नावे सदर निवेदन देण्यात आल्याची माहिती गोरेगाव विधानसभा संघटक व माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी दिली.सदर शवविच्छेदन केंद्र लवकर सुरू करा अन्यथा शिवसेना वतीने आंदोलन करण्यात येईल असा ठोस इशारा दिलीप शिंदे यांनी प्रशासनाला दिला.
यावेळी विधानसभा संघटक व माजी नगरसेवकवराजू पाध्ये, समाजसेवक विजय आयरे , माजी शाखाप्रमुख चंद्रकांत मोरे उपशाखाप्रमखं विनोद माने, बाळा सोनवणे, संदीप लाखण , महेंद्रा इंगवे शिवसैनिक व स्थानिक नागरिक उपस्थित होते.