सिद्धिविनायक चरणी मनसेचे साकडे, न्यायासाठी मनसेचा आगर बाजार ते सिद्धिविनायक मंदिर मोर्चा
By मनोहर कुंभेजकर | Published: December 21, 2022 02:55 PM2022-12-21T14:55:40+5:302022-12-21T14:56:46+5:30
प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या देणगीचा गौरवापर करणाऱ्या मंदिर न्यासाच्या विश्वासताना सुबुद्धी देऊन
मुंबई:-
प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या देणगीचा गौरवापर करणाऱ्या मंदिर न्यासाच्या विश्वासताना सुबुद्धी देऊन भाविकांना न्याय मिळवून दे असे साकडे मनसेने आज सिद्धिवनायक चरणी घातले. प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात चाललेला अनागोंदी कारभार आणी कथित गैरव्यवहार कारवाई संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करत मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वााखाली आज आगार बाजार ते सिद्धिविनायक मंदिर मोर्चा काढण्यात आला.
मोर्चात महिलांसह मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. हातात फलक घेऊन विश्वस्थांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी करत मंदिर परिसरात घोषणाबाजी केली. त्यानंतर त्यांनी मंदिरात जाऊन सिद्धिविनायकचे दर्शन घेतले.
मंदिर हे लोकांच्या श्रद्धेचे स्थान आहे आर्थिक गैरव्यावहारचा अड्डा नाही, प्रत्येक रोगराई स्वच्छता शिकवते पण आपण कोव्हिडच्या माध्यमातून दान पेटीच साफ केली, राजकारणात देवावर श्रद्धा ठेवणे योग्य मात्र देवाच्या श्रद्धेचा राजकारण करणे हे पाप आहे अशा प्रकारचे वक्तव्य फलकबाजीतून व्यक्त करण्यात आले.
अधिवेशनानंतर त्यावर चौकशी होईल आणि कारवाई करण्यात येईल असे आश्वासन शिंदे -फडणवीस सरकारने आम्हला दिले आहे. आता आम्ही विध्वस्तना सुबुद्धी देण्यासाठी सिद्धिविनायकला गाऱ्हाणे घालण्यासाठी आलो असल्याचे किल्लेदार यांनी लोकमतला सांगितले.