Video : पूरग्रस्तांना सिद्धीविनायक पावला, गॅस शेगडीनं भरलेले दोन कंटेनर खान्देशात रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 13:49 IST2021-09-16T13:41:22+5:302021-09-16T13:49:56+5:30
सामाजिक बांधिलकीतून सिद्धीविनायक मंदिर न्यास नैसर्गिक आपत्तीग्रस्तं नागरिकांच्या डोक्यावर नेहमीच मदतीचं छत्र धरतं.

Video : पूरग्रस्तांना सिद्धीविनायक पावला, गॅस शेगडीनं भरलेले दोन कंटेनर खान्देशात रवाना
मुंबई - खान्देशात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतीवृष्टीमुळे पूरपरीस्थिती निर्माण झाली होती. या पूराच्या पाण्यात अनेक गरीब नागरिकांचे संसार वाहून गेले. संसार वाहून गेलेल्या या नागरिकांची चूल पेटवण्यासाठी सिद्धीविनायकाच्या चरणी रिलायंन्स उद्योग समुहाने अर्पण केलेल्या गॅस शेगडी आता पूरग्रस्तांच्या संसाराचा गाडा सुरू करण्यासाठी त्यांना देण्यात येत आहेत.
गॅस शेगडीने भरलेले कंटेनर जळगाव आणि नांदगाव येथे पाठवण्यात आलेत. यापूर्वी असेच सहा गस शेगडीने भरलेले कंटेनर पूरग्रस्तं चिपळुण आणि महाड तहसीलदार कार्यालयाकडे पाठवण्यात आले होते. सामाजिक बांधिलकीतून सिद्धीविनायक मंदिर न्यास नैसर्गिक आपत्तीग्रस्तं नागरिकांच्या डोक्यावर नेहमीच मदतीचं छत्र धरतं. यापुढेही कायम ही समाजसेवेची वात तेवत रहाणार असल्याचं मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितलं आहे.
मुंबई - सिद्धीविनायक ट्रस्टकडून गँस शेगडीने भरलेले कंटेनर जळगाव आणि नांदगाव येथे पाठवण्यात आलेत pic.twitter.com/MLtdcfLBZX
— Lokmat (@MiLOKMAT) September 16, 2021