Join us

सिध्दीविनायक, शीतलादेवीचे काम सुसाट; मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी घेतला आढावा

By सचिन लुंगसे | Published: January 25, 2024 7:20 PM

कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे या अधिकाऱ्यांसोबत सातत्याने कामांची पाहणी करत आहेत.

मुंबई: कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो ३ चे काम प्रगती पथावर असून, दक्षिण मध्य मुंबईतीलमेट्रो मार्गावर असणाऱ्या शीतलादेवी आणि सिध्दीविनायक स्थानकांच्या कामांचा आढावा घेत कामांबाबत कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी समाधान व्यक्त केले. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून भुयारी मेट्रोचे काम सुरू असून, हा मार्ग दोन टप्प्यात विभागाला गेला आहे. तर या मार्गाचे कारशेड आरेमध्ये आहे.

कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे या अधिकाऱ्यांसोबत सातत्याने कामांची पाहणी करत आहेत. नुकतेच अश्विनी भिडे यांनी प्रकल्प संचालक सुबोध गुप्ता, सिस्टीम संचालक राजीव यांच्यासोबत सिध्दीविनायक, दादर आणि शीतलादेवी या मेट्रो स्थानकांच्या कामाची पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी सिस्टीम वर्क, सिव्हिल वर्क, लिफ्टसह सरकत्या जिन्यांच्या कामाचा आढावा घेतला. दरम्यान, दोन्ही टप्प्यातील कामे जवळपास पुर्ण होत आली असून, पहिला टप्पा सुरु होण्याच्या प्रतीक्षेत आहे. पहिला टप्पा : आरे ते बीकेसीस्थानके : १०, ९ भुयारी तर १ जमिनीवरअंतर : १२.४४ किलोमीटर दुसरा टप्पा : बीकेसी ते कफ परेडस्थानके : १७अंतर : २१.३५ किलोमीटर 

  • मेट्रो ३ ही मेट्रो १, २, ६ आणि ९ यांना जोडली जाईल.
  • मोनोरेलही मेट्रोची जोड मिळणार आहे.
  • चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जोडली जाईल.
  • विमानतळांनाही हा मार्ग जोडला जाईल.

   

टॅग्स :मुंबईमेट्रो