Join us

मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 02:38 IST

मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन पाच दिवस बंद राहणार आहे. माघी गणेशोत्सवानिमित्त सिद्धिविनायकाच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार आहे.

मुंबई : मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन पाच दिवस बंद राहणार आहे. माघी गणेशोत्सवानिमित्त सिद्धिविनायकाच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारपासून १० जानेवारीपासून १४ जानेवारीपर्यंत भाविकांना सिद्धिविनायकाचे थेट दर्शन घेता येणार नाही.मात्र, या दरम्यान भाविकांना गणपतीच्या प्रतिमूर्तीचे दर्शन घेता येणार आहे. त्यानंतर, सोमवारी १५ जानेवारीला गणेशमूर्तीचेपूजन आणि आरती झाल्यानंतर, दुपारी १ वाजता भाविकांना नेहमीप्रमाणे गाभा-यातून दर्शन घेता येईल, अशी माहिती सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि अभिनेते आदेश बांदेकर यांनी दिली आहे.

टॅग्स :सिद्धिविनायक गणपती मंदिर