येत्या गुरुवारपासून सिद्धीविनायक मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. मात्र, मंदिरात प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला बुकिंग करावे लागणार आहे. यासाठी तुमच्याकडे अँड्रॉईड किंवा अॅपलचा मोबाईल असणे गरजेचे आहे. तासाला 250 जणांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
दर्शनाच्या आरक्षणासाठी Apple मोबाईलधारकांना सदर लिंक https://apps.apple.com/in/app/sidhivinayak-temple/id1254939351 व Android मोबाईलधारकांना https://play.google.com/store/apps/details?id=com.cynapto.ssvt या लिंकवर जाऊन अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. दर गुरूवारी दुपारी १२.०० वाजता न्यासाकडून दर्शनाकरिता भाविकांसाठी मर्यादित सांकेतिक चिन्ह (QR CODE) खुले करण्यात येतील. दर तासाला २५० प्रमाणे सांकेतिक चिन्ह (QR CODE) भाविकांना आरक्षित (BOOKING) करता येईल.
ज्या भाविकांनी ऑनलाईन सांकेतिक चिन्ह (QR CODE) आरक्षण (BOOKING) केले आहे. त्याच भाविकांना एस. के. बोले मार्गावरील सिध्दी प्रवेशद्वार व काकासाहेब गाडगीळ मार्गावरील रिध्दी चेकपोस्ट येथून दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. ज्या भाविकांकडे ऑनलाईन आरक्षण (BOOKING) सांकेतिक चिन्ह (QR CODE) नाहीत, त्या भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार नाही.ऑनलाईनद्वारे उपलब्ध होणारे सांकेतिक चिन्ह (QR CODE) हा अहस्तांतरणीय (NON TRANSFERABLE) असून व्हॉट्स अॅपद्वारे, फोटोकॉपी आणि स्क्रीनशॉटद्वारे सांकेतिक चिन्हाची (QR CODE) प्रत स्वीकारली जाणार नाही. ज्या भाविकांनी सांकेतिक चिन्ह (QR CODE) ऑनलाईन आरक्षण (BOOKING) केले आहे, परंतु ज्या भाविकांना त्या दिवशी येणे शक्य नाही, त्या भाविकांनी त्यांचे ऑनलाईन आरक्षण (BOOKING) सांकेतिक चिन्ह (QR CODE) रद्द करावे, जेणेकरून इतर भाविकांना श्री दर्शन घेता येणार आहे. Siddhivinayak Temple App असे या अॅपचे नाव आहे.
सूचना काय...
- दर्शनासाठी येतांना कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
- १० वर्षाखालील मुले, ६५ वर्षावरील वृध्द तसेच गर्भवती महिलांनी शक्यतो दर्शनासाठी प्रवेश करणे टाळावे.
- मंदिरात प्रवेश करतांना मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. योग्य अंतर ठेवा (६ फुट – ६ फुट)
- मंदिर परिसरात ६-६ फुटावर स्टीकर बसविण्यात आले आहेत. भाविकांनी वापर करावा.
- मंदिरात प्रवेश केल्यानंतर गर्दी करणे टाळावे. दर्शनासाठी येतांना सामान, बॅग व लॅपटॉप आणू नये.
- हार, फुले, नारळ, पूजेची सामग्री व प्रसाद घेऊन भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.