- गौरी टेंबकर-कलगुटकरमुंबई - दररोज दारूच्या बाटल्यांचा आणि सिगारेटच्या रिकाम्या पाकिटांचा जमा होणारा खच साफ करायचा. ते करून जर वेळ उरलाच, तर त्यानंतर मैदानात खेळाची प्रॅक्टिस करायची, अशी स्थिती आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर मजल मारणाऱ्या मालवणीतील विद्यार्थ्यांची. याबाबतचा एक व्हिडीओ ‘लोकमत’च्या हाती लागला असून, एकंदरच या सगळ्या परिस्थितीचे खरे चित्र आपल्यासमोर उभे राहते.मालवणीतील खेळाच्या मैदानासाठी राखीव असलेला भूखंड शैक्षणिक संस्थेला देण्याची मागणी ‘वंदे मातरम’ या खासगी संस्थेने केली होती. अद्याप त्यावर काहीही उत्तर शासनाकडून त्यांना मिळाले नाही. या मैदानाचा नेमका कसा वापर केला जात आहे, हे दाखविणारा एक व्हिडीओ या संस्थेने शूट केला आहे. त्यामध्ये मैदानात मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आणि सिगारेटच्या पाकिटांचा ढीग दिसत आहे. हा ढीग खेळाची तालीम करण्यासाठी आलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना रोज साफ करावा लागत असल्याचे शाळेच्या शिक्षकांचे, तसेच पालकांचे म्हणणे आहे.वंदे मातरम शिक्षण संस्थेच्या वंदे मातरम स्पोटर््स अॅकॅडमीने अगदी दीड वर्षाच्या आत शेकडो मेडल, ट्रॉफी जिंकून आता आंतरराष्ट्रीय पातळी गाठली आहे. पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसºया खुल्या राष्ट्रीय तायक्वांडो चॅम्पियनशिप २०१९मध्येदेखील जमशेद लाझीम (गोल्ड), राम निषाद (गोल्ड), हिृतिक मौर्य (सिल्वर) व हिृतिक शर्मा (ब्राँझ) या गुरुकुल शाळेच्या विद्यार्थ्यांनी मेडल मिळविले आहेत.
खेळाच्या मैदानावर चरसी आणि गर्दुल्ल्यांचा कब्जाया मुलांना खेळासाठी मैदान उपलब्ध करून देण्यात स्थानिक राजकारणी आणि प्रशासन अयशस्वी ठरले आहे. खेळाच्या मैदानावर चरसी आणि गर्दुल्ल्यांचा कब्जा आहे़ वारंवार तक्रार करूनदेखील पालिका आणि पोलीस प्रशासन या विरोधात ठोस पावले उचलत नसल्याची खंतही शिक्षकांनी व्यक्त केली आहे.