फेरीवाल्यांचा वेढा, झोपड्यांचा पुनर्विकास रखडलेलाच

By Admin | Published: January 13, 2015 12:33 AM2015-01-13T00:33:31+5:302015-01-13T00:33:31+5:30

गांधीनगर, नळपाडा या झोपडपट्टीच्या नावाने ओळख असलेल्या प्रभाग क्र मांक ७ मध्ये वसंत विहारचा काही भाग, म्हाडामधील स्वामीविवेकानंद नगर, लोकउपवन फेज २, जवाहरनगर, तुळशीधाम, तत्त्वज्ञानविद्यापिठ

The siege of the hawk, the redevelopment of the huts | फेरीवाल्यांचा वेढा, झोपड्यांचा पुनर्विकास रखडलेलाच

फेरीवाल्यांचा वेढा, झोपड्यांचा पुनर्विकास रखडलेलाच

googlenewsNext

नामदेव पाषाणकर, घोडबंदर
गांधीनगर, नळपाडा या झोपडपट्टीच्या नावाने ओळख असलेल्या प्रभाग क्र मांक ७ मध्ये वसंत विहारचा काही भाग, म्हाडामधील स्वामीविवेकानंद नगर, लोकउपवन फेज २, जवाहरनगर, तुळशीधाम, तत्त्वज्ञानविद्यापिठ,या भागाचा समावेश आहे. गांधीनगरमधील झोपडपट्टीचा पुनर्विकास रखडल्यामुळे येथील रहीवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे़ अरुंद गल्ल्यामुळे पायवाटा,गटारे सुधारणे अवघड झाले आहे.
निधीची तरतूद नसल्यामुळे तुळशीधाम रोडवरील बगीचाचा विकास रखडला आहे. नळपाड्यात ग्रीनवूड कॉम्प्लेक्स इमारतीचा धोकादायक सांगाडा अघटीत घटनाचा अड्डा बनला असताना त्याकडे पालिकेचे दुर्लक्ष राहिले आहे
नळपाडा हा शासकिय व खाजगी जागेवर वसला असून येथे अंदाजे तेराशे झोपड्या आहेत. तर गांधीनगरमध्ये अडीच हजार झोपड्यांतून रहीवासी वास्तव्य करीत आहे. गांधीनगरमध्ये मनपाची शाळा असली तरी खासगी शाळेकडे पालकांचा कल दिसून येत आहे. वसंतविहार नाक्याला फेरीवाल्याचा वेढा पडल्याने येथे अपघाताचा धोका कायम आहे. याच नाक्यावर अपघातात दोन महिलांचा बळी गेला होता, त्यावेळी पालिकेने फेरीवाल्यांवर कारवाई केली होती. परंतु सध्या येथे फेरीवाल्यांची जत्रा भरली आहे.
फेरीवाल्यानी रस्ता अडवला असून खरेदीला येणार्या श्रीमंताच्या गाड्या रस्त्यावर उभ्या राहतात. यामुळेही अपघाताचा धोका आहे. फेरीवाल्यांवर पालिकेचे व वाहनावर वाहतूक पोलीसांचे नियंत्रण राहिले नाही. गांधीनगरमध्येही हीच स्थिती आहे. या फेरीवाल्यांचा त्रास शाळेतील मुलांना अधिक होत असल्याची पालकांची तक्रार आहे.

Web Title: The siege of the hawk, the redevelopment of the huts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.