Join us

वाळकेश्वर येथील बाणगंगा परिसराला पोलिसांचा वेढा

By admin | Published: August 20, 2015 2:08 AM

राजभवनमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ््यात कोणताही गोंधळ होऊ नये, म्हणून पोलिसांनी वाळकेश्वर येथील बाणगंगा परिसराला वेढा घातला होता

मुंबई : राजभवनमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ््यात कोणताही गोंधळ होऊ नये, म्हणून पोलिसांनी वाळकेश्वर येथील बाणगंगा परिसराला वेढा घातला होता. दुपारपासूनच पोलीस खासगीसह सार्वजनिक परिवहन सेवेतील वाहनांचीही कसून झडती घेत होते.मरिन ड्राइव्हपासून बाणगंगेला जाणाऱ्या मार्गावरच पोलिसांनी नाकाबंदी लावली होती. टॅक्सी आणि बेस्ट बसमध्ये चारपेक्षा जास्त लोक एकत्र दिसल्यास त्यांची चौकशी केली जात होती. तर राजभवनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ निमंत्रण पत्रिका असलेल्यांनाच प्रवेश देण्यात आला. सायंकाळी साडेचारच्या सुमारास भाजपाच्या काही महिला कार्यकर्त्यांनी शालेय शिक्षणमंत्री मंत्री विनोद तावडे यांच्यासह मुख्य प्रवेशद्वाराआधी असलेल्या खंडेराय मंदिराजवळ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. त्यानंतर पोलिसांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तींना प्रवेशद्वाराजवळ फिरकू दिले नाही.