मुंबई : गेले वर्षभर पाणीकपातीची झळ सहन करणाऱ्या मुंबईकरांसाठी अखेर खुशखबर आहे़ मुसळधार पावसामुळे तलावांतील पाण्याची पातळी दररोज वाढत आहे़ गतवर्षीच्या तुलनेही तलावांमध्ये दुप्पट जलसाठा आहे, त्यामुळे प्रशासन पुढच्या आठवड्यात पाणीकपात मागे घेण्याचे संकेत आहेत़ जुलै महिन्यातील पंधरवडा पूर्ण होण्याआधीच तलावांमध्ये तब्बल पाच लाख दशलक्ष लीटरहून अधिक जलसाठा तलावांमध्ये जमा झाला आहे़ तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने काही तलाव लवकरच भरून वाहण्याची चिन्हे आहेत़ त्यामुळे पाणीकपात मागे घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे़ भाजपाचे दिलीप पटेल यांनी स्थायी समितीच्या बैठकीतून पाणीकपात मागे घेण्याची मागणी केली़ त्यानुसार, तलावांमधील पाण्याच्या पातळीचा आढावा घेऊन स्थायी समितीच्या पुढच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त डॉ़ संजय मुखर्जी यांनी दिले़ (प्रतिनिधी)1पवई तलावाकडे महापालिका प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करत असून, दिवसेंदिवस या तलावाचे पाणी अस्वच्छ होत आहे. हे पाणी आता जनावरांसाठीही पिण्यायोग्य राहिले नसल्याचे धक्कादायक वास्तव अहवालातून समोर आले आहे. प्लँट अॅनिमल वेल्फेअर सोसायटीने येथील पाण्याचे नमुने महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवा प्रयोगशाळेतून तपासले असून, यानंतर ही माहिती समोर आली आहे.2पवई तलावाच्या संवर्धनासाठी प्लँट अॅनिमल वेल्फेअर सोसायटी ही संस्था काम करते. तलावाच्या प्रदुषणासंदर्भात अनेकदा या संस्थेतर्फे आंदोलने करण्यात आली. मात्र, महापालिका याकडे लक्ष देत नसल्याने अखेर संस्थेने पाण्याचे नमुने घेतले. शिवाय, हे नमुने महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवा प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले. या तपासणीत तलावातील पाण्यात प्रदूषित घटक असल्याचे समोर आले आहे.3बॅक्टोरिअल अॅनलिसिस अहवालात प्रदूषित घटकांचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. पवई तलावातील पाण्याचा प्रवाह आरे कॉलनीतून वाहतो. यातील काही पाण्याचा पुरवठा आरे कॉलनीमधील तबेल्यालाही होतो. परिणामी, प्रदूषित घटकांनी भरलेले पाणी येथील प्राण्यांसह मानवालाही हानिकारक ठरेल, अशी भीती संस्थेने व्यक्त केली आहे.4पवई तलावातील तीन ठिकाणच्या पाण्याची तपासणी करण्यात आली. या तिन्ही पाण्याच्या नमुन्यामध्ये कोलीफॉर्म आणि थर्माेटॉलरंट कोलीफॉर्म असल्याचे समोर आले. अशी माहिती केएमके कॉलेज आॅफ फॉर्मसीच्या सहायक प्राध्यापक डॉ. वंदना पांडा यांनी दिली, असे प्लँट अॅनिमल वेल्फेअरचे सचिव सुनीश कुंजू यांनी सांगितले.नदी शुद्धीकरणासाठी करार; मिठी नदीचाही समावेशरशिया दौऱ्यावर असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सेंट पीटर्सबर्ग राज्याचे गव्हर्नर जॉर्जी पोल्तॉवचेंको यांनी पाणीपुरवठा आणि सांडपाणी प्रक्रियाविषयक महत्त्वाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. त्यानुसार, तांत्रिक आणि धोरणात्मक सहकार्य महाराष्ट्राला मिळणार आहे. मुंबईतील मिठी नदीसह इतर नद्यांच्या शुद्धीकरणासाठीही या संस्थेची मदत होणार आहे. सेंट पीटर्सबर्गमधील वोडोकॅनाल ही संस्था त्यासाठी योगदान देणार आहे. दोन्ही राज्यात संयुक्त कृती गट स्थापन करण्यात येणार असून, प्रस्तावित सहकार्य करण्याबाबतचा एक आराखडा निश्चित करण्यात येणार आहे. या करारासोबतच नगरविकास, स्मार्टसिटीची उभारणी, जहाजबांधणी, माहिती तंत्रज्ञान, उच्चशिक्षण आदींबाबतही सेंट पीटर्सबर्गकडून महाराष्ट्राला सहकार्य करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या करारावर कालच स्वाक्षरी करण्यात आली होती. चार दिवसांच्या रशिया दौऱ्यानंतर मुख्यमंत्री गुरुवारी मुंबईत परतणार आहेत.
मुंबईत पाणीकपात रद्द होण्याचे संकेत
By admin | Published: July 14, 2016 3:48 AM